शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘बेलगंगा’ लिलावावरील स्थगिती उठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 19:59 IST

जिल्हा बँकेतर्फे लिलाव केलेला आणि चाळीसगाव येथील अंबाजी ट्रेडींग कंपनीने विकत घेतलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेवरील अंतरीम स्थगिती औरंगाबाद खंडपीठाच्या व्दिसदस्यीय पीठाने आज उठवली.

चाळीसगाव (जि. जळगाव), दि. ३१ - जिल्हा बँकेतर्फे लिलाव केलेला आणि चाळीसगाव येथील अंबाजी ट्रेडींग कंपनीने विकत घेतलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेवरील अंतरीम स्थगिती औरंगाबाद खंडपीठाच्या व्दिसदस्यीय पीठाने आज उठवली. यामुळे कारखान्याच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. अंबाजी ट्रेडींग कंपनीने कारखाना ३९ कोटी २२ लाखास  विकत घेतल्यानंतर बेलगंगा कर्मचारी युनियन तर्फे  आपली पगारासह इतर देणी मिळावी म्हणून कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेला स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने स्थगिती दिली होती. सोमवारी अंबाजी ट्रेडींग कंपनीतर्फे अ‍ॅड.धनंजय ठोके यांनी तर बँकेच्या वतीने अ‍ॅड.व्ही.डी.साळुंखे, युनियन तर्फे अ‍ॅड.सुरेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. न्यायमुर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व मंगेश पाटील ऐकून लिलाव प्रक्रियेवरील अंतरीम स्थगिती उठवली. सदरची याचिका प्रलंबित ठेवतांनाच कारखान्याच्या लिलावाचा मार्ग मोकळा केला. कारखान्या संदर्भात काय निर्णय लागतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी अंबाजी ट्रेडींग कंपनीचे प्रवर्तक व काराखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी लिलावात भाग घेऊन कारखाना विकत घेतला आहे.लिलावावरील स्थगिती न्यालयाने उठवल्याने कारखाना सुरु होण्याचा अडथळा दूर झाला आहे. कामगारांनाही न्याय देण्याची भूमिका आम्ही प्रथम पासूनच घेतली आहे. कारखाना हा तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने येत्या गळीत हंगामात तो सुरु करणार आहोत. -चित्रसेन पाटील, माजी चेअरमन बेलगंगा सह. साखर कारखाना