शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारी पिढीसाठी मुलांच्या संवेदना जपा : अ‍ॅड़ अपर्णा रामतीर्थकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:19 IST

आपल्या वागण्या-बोलण्यातून मुला-मुलींना काय वाटते, त्यांच्यावर काय संस्कार होतील याचा विचार करीत त्यांच्या संवेदना जपा, तरच संस्कारी पिढी घडेल, असा सल्ला अ‍ॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी पालकांशी हितगूज साधताना दिला.

ठळक मुद्देगुरूवर्य अ‍ॅड़ अ़ वा़ अत्रे प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानपालकांशी साधला हितगुजसंस्कृतीचा विनाश दारात उभा

जळगाव : आपल्या वागण्या-बोलण्यातून मुला-मुलींना काय वाटते, त्यांच्यावर काय संस्कार होतील याचा विचार करीत त्यांच्या संवेदना जपा, तरच संस्कारी पिढी घडेल, असा सल्ला अ‍ॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी पालकांशी हितगूज साधताना दिला.अ‍ॅड़ अच्युतराव अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त गुरूवर्य अ‍ॅड़ अ़वा़अत्रे प्रतिष्ठानतर्फे २९ जून रोजी कांताई सभागृहात सायंकाळी अ‍ॅड़अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘पालकांशी हितगुज’ या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या.संस्कृतीचा विनाश दारात उभाआपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच अ‍ॅड़रामतीर्थकर यांनी आपण मुलांना संस्कार देण्यात कमी पडत असल्याचा उल्लेख करून नात्यांमधील ओलावा संपत असल्याची खंत व्यक्त केली. आज ‘आई’ सर्वत्र शोधावी लागत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आपण कसे दिसतो यापेक्षा मी कशी आहे हे ओळखा. बाहेरचे धोके मुलांना कळावे म्हणून आईने सतर्क राहणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. मुलांच्या हाती मोबाईल देऊन ते काय पाहत आहे, याकडे आपण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वेगवेगळ््या ‘फेस्टीवल’ तसेच गेमच्या आहारी मुले जात आहे. त्यामुळे संस्कृतीचा विनाश दारात उभा असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यासाठी वेळीच जागे, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.मुलांचे कौतूक कराआज कुटुंब व्यवस्थेचा पाया खचत असून मुले पालकांपेक्षा बाहेर मित्रांमध्ये जास्त रमत आहे. त्यामुळे मुलांना किमान दोन तास वेळ देत त्यांच्या भावना जपा, त्यांचे कौतूक करणे शिका, त्यांना दाद द्या. त्यामुळे ते बाहेर रमण्यापेक्षा घरात रमतील, असेही अ‍ॅड. रामतीर्थकर म्हणाल्या.मुलींसाठी पालकांची भूमिका महत्त्वाचीमुलीची वडिलांशी तर मुलाची आईशी जवळीक असते. त्यामुळे वडिलांनी पत्नीसोबतच मुलीचेही कौतूक केले पाहिजे, असे सांगून त्यांनी मुलांवर वाचनाचे संस्कार करण्याचा सल्ला दिला. आज सर्व सुखसोयी घरात असल्या तरी आपण ‘बेडरुम’ तयार करून दुरावा निर्माण केल्याचे सांगून त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचा सल्ला दिला.प्रारंभी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अ‍ॅड.अशोक माथूर वैश्य, प्रतिमा अत्रे, सदस्य अ‍ॅड. सुशील अत्रे, अनिल कांकरिया यांच्या उपस्थितीत अ‍ॅड़अच्युतराव अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक पद्मजा अत्रे यांनी केले.सूत्रसंचालन सोनिका मुजूमदार यांनी तर आभार लीना कुलकर्णी यांनी मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव