शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दमदार ‘बॅटींग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:42 IST

हवेत गारवा, चाळीस मिनिटे आनंदवर्षा

जळगाव : शहर आणि परिसरात रात्री मुसळधार पाऊस पडला. अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या शेतकरीराजाला पावसाने आपल्या ‘एन्ट्री’ने खूष करून टाकले आहे. चाळीस मिनिटे पडलेल्या या पावसाने हवेत गारवाही निर्माण झाला होता.जळगाव शहर आणि परिसरात गेले आठ दिवस पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला होता. त्याचबरोबर हवेत उष्माही निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच नागरिकही पावसाच्या प्रतिक्षेत होते. या साऱ्यांनाच पावसाने दमदार पुनरागमन करत गारवा दिला.यापूर्वी पावसाने चक्रीवादळाच्या वेळी हजेरी लावली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वीही जोरदार पाऊस बरसला होता. त्यानंतर पावसाने सातत्याने पाठ फिरवली. पाऊस नसल्याने अनेक पिके संकटात आली होती. जिल्ह्यातील ८८ टक्के कामे पूर्ण झाली असली तरी पाऊस नसल्याने कदाचित दुबार पेरणीचे संकट तर ओढवणार नाही ना, अशी भीती शेतकºयांमध्ये व्यक्त होत होती. दि. २ जुलैपासून पाऊस बरसेल, हा हवामान खात्याचा अंदाजही पावसाने खोटा ठरवला होता. मात्र, शनिवारी आलेल्या पावसाने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शनिवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. रिमझिम बरसणाºया पावसाने काहीवेळातच मुसळधार रुप धारण केले. जवळपास चाळीस मिनिटे हा पाऊस बरसत होता. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते.वीजपुरवठा खंडितपावसामुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसर, रायसोनीनगर, जिल्हा पेठ, दिक्षित वाडी, जयकिसनवाडी, पिंप्राळा, महाबळ, गणेश कॉलनी यासह शहरातील वीजपुरवठा तासभर खंडित झाला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव