शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत राधिनी, वृषालीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसºया दिवशी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने विजय मिळवला. उमवि संघातील राधिनी भामरे आणि वृषाली ठाकरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संघावर २-० ने विजय मिळवून दिला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत उमविच्या पुरुष ...

ठळक मुद्देउमवि पुरुष संघाला मिळाला वॉकओव्हरगुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संघावर २-० ने विजय

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसºया दिवशी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने विजय मिळवला. उमवि संघातील राधिनी भामरे आणि वृषाली ठाकरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संघावर २-० ने विजय मिळवून दिला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत उमविच्या पुरुष संघाला एम.पी. कृषी विद्यापीठ उदयपूरकडून वॉकओव्हर मिळाला. त्यामुळे हा संघ थेट पुढच्या फेरीत पोहचला आहे. मुलींच्या संघातील खेळाडू राधिनी भामरे हिने गुजरात विद्यापीठाच्या संचयिता हिला २१-९,२१-६असे पराभूत केले. तर वृषाली ठाकरे हिने कोमलवर  २१-२,२१-५ असा विजय मिळवला.  राधिनी आणि वृषाली यांनी मंगळवारी झालेल्या सामन्यातदेखील एकतर्फी विजय मिळवला होता. बुधवारच्या सामन्यात पहिल्या गेममध्ये संचयिता हिने राधिनीला काही वेळ चांगले स्मॅश मारुन त्रस्त केले. मात्र जोरदार स्मॅश आणि चतुर खेळाच्या जोरावर राधिनीने हा गेम जिंकला. दुसºया गेममध्ये पहिल्या काही मिनिटात चांगल्या रॅली रंगल्या मात्र त्यानंतर राधिनीने आक्रमकपणे खेळ केला आणि दुसरा गेमही २१-६ अशा मोठ्या फरकाने जिंकला. बुधवारी सायंकाळपर्यंत झालेल्या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे - पुरुषांच्या सामन्यात आर.के. विद्यापीठ, राजकोटने पुरल विद्यापीठ, लिंबडावर ३ -१ने विजय मिळवला. बरकतुल्हाह विद्यापीठ, भोपाळने स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठ, गांधीनगरवर ३ -० ने विजय मिळवला. देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूरने गुजरात आयुर्वेद विद्यापीठावर ३-०ने मात केली.  शारदा पटेल विद्यापीठ, विद्यावल्लभ नगरने भारती विद्यापीठावर ३ -१ ने विजय मिळवला.  महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदाने आय.टी.एन. विद्यापीठ, ग्वाल्हेरवर ३-१ ने मात केली. पुरुष दुहेरीतील सामन्यात नवसारी कृषी विद्यापीठाने नागपूरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठाला २-० ने हरविले. तर अन्य सामन्यात सुरतच्या वीर नरहर विद्यापीठाने महाराजा सूरजमल ब्रीज विद्यापीठ, भरतपूरवर ३-० ने विजय प्राप्त केला. तसेच सिम्बॉयसिस पुणे विद्यापीठाने चरोत्तर विद्यापीठावर  ३-१ ने मात केली. सोलापूर विद्यापीठालादेखील दुहेरी यश प्राप्त झाले. या विद्यापीठाने सुरतच्या अ‍ॅरो विद्यापीठाचा ३-०ने पराभव केला. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाला मात्र उजैनच्या विक्रम विद्यापीठाकडून ३-२ ने पराभव पत्करावा लागला. गुजरातच्या आर.के. विद्यापीठ, राजकोटने परुल विद्यापीठाचा ३-१  ने पराभव केला. तर अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गुजरात नॅशनल लॉ विद्यापीठाला ३-० ने नमविले. सिखर विद्यापीठाने बुंदेलखंड विद्यापीठावर ३ -२ असा विजय मिळवला. प्रवरा मेडिकल इन्स्टिट्यूूटला मात्र जय नारायण व्यास विद्यापीठ, जोधपूरकडून ३-० ने पराभूत व्हावे लागले. मुंबई विद्यापीठाने कवी नरसिंह मेहता विद्यापीठ, जुनागडवर ३-० असा एकतर्फी विजय प्राप्त केला. तर आर.जी. तंत्रज्ञान विद्यापीठ, भोपाळने देखील एम.आय.टी. पुणे संघाचा ३-०  ने पराभव केला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने गोंडवाना विद्यापीठाला २-०ने नमविले. सायंकाळी उशिरापर्यंत सामने सुरू होते. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील,              प्र-कुलगुरू प्रा.पी.पी. माहुलीकर, कुलसचिव भ. भा. पाटील तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. 

टॅग्स :Sportsक्रीडाBadmintonBadminton