शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तहसीलला हयातीच्या दाखल्यांसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:48 IST

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्र्थींना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचे दाखले सादर करावे लागत असल्याने वृध्दांनी पाचोरा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

ठळक मुद्देनोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत हयातीचे दाखले सादर करण्याची मुदतएकाच वेळी अनेकांनी गर्दी केल्याने तासन्तास उभे राहावे लागत आहे रांगेतयोजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्र्थींना वर्षातूून एकदा हयातीचा दाखला करावा लागतो सादर

आत्माराम गायकवाडखडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्र्थींना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचे दाखले सादर करावे लागत असल्याने वृध्दांनी पाचोरा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.अनेकांनी एकाच वेळी गर्दी केल्याने वृध्द महिला व पुरुषांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत दाखले सादर करण्याची मुदत असताना वृध्दांनी एकच गर्दी केल्याने मोठ्या रांगा लागल्या आहेत.पाचोरा तालुक्यात श्रावणबाळ वृधापकाळ योजना (६,८१७), संजय गांधी निराधार योजना (५,६००), इंदिरा गांधी निराधार योजना (४,९६९), इंदिरा गांधी विधवा योजना (४६६) व इंदिरा गांधी अपंग योजना (२६) असे एकूण १७ हजार ८७८ लाभार्थी आहेत. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्र्थींना वर्षातूून एकदा नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत हयातीचा दाखल कार्यालयात सादर करावा लागतो. दाखले सादर करताना ग्रामीण भागात सरपंच अथवा पोलीस पाटील, तर शहरी भागात रहिवासी असलेल्या प्रभागातील नगरसेवकाचा दाखल घेणे आवश्यक असतो. या दाखल्यासोबत आधार कार्डाची झेरॉक्स, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स व खात्री करण्यासाठी पास बुकची मूळ प्रत आणणे आवश्यक असते. यापूर्वी लागार्थींचे खाते संबंधित गावाच्या पोष्ट कार्यालय व गावाजवळील जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते. मात्र आता ते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात आल्याने लाभाथींचे खाते आधारशी लिंक करून थेट खातेदाराचे नावावर पैसे ट्रान्स्फर करण्यासाठीची ही योजना आहे. यात विविध योजनांचे अनुदान ६०० रुपयांहून १ हजार रुपये तर इंदिरा गांधी विधवा योजनाचे ७०० हून एक अपत्य असलेल्या लाभार्थी साठी १ हजार १०० रुपये व दोन अपत्यासाठी १ हजार २०० रुपये अनुदान मिळणार असल्याने या लाभार्र्थींनी आपत्यांचे दाखले जोडावे, असे आवाहन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारPachoraपाचोरा