शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठीही करावी लागते येथे अडथळ््यांची शर्यत, प्रमाणपत्रासाठी पहाटेपासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:15 IST

जिल्हा रुग्णालयात लांबच लांब रांगा

जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र वितरीत न होण्यासह संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पुरेसा वेळ दिला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी वाढून बुधवारी अर्धा कि.मी.पर्यंत रांगा लागल्या. केस पेपरसाठी फिरवाफिरव केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांकडून केला जात आहे.दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र देण्यासाठी दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासह त्यांची नोंदणी केली जाते. यासाठी प्रत्येक आठवड्याला जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी होते. त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी दिव्यांग बांधवांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते व तसा संदेश दिव्यांगांना पाठविला जातो. त्यानंतर ठरवून दिलेल्या दिवशी दिव्यांग बांधव रुग्णालयात येतात. असे असले तरी ही प्रक्रिया पूर्ण करणे अजूनही ग्रामीण भागातील दिव्यांगांना शक्य होत नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे अजूनही जिल्हा रुग्णालयात दर आठवड्याला मोठी गर्दी होते. त्यात गेल्या आठवड्यात नाताळची सुट्टी असल्याने या आठवडत गर्दीमध्ये अधिकच भर पडली व बुधवार, १ जानेवारी रोजीदेखील पुन्हा लांब रांगा लागल्या.केस पेपर काढण्यासाठी फिरवाफिरवबुधवारी मोठी गर्दी झालेली असताना आलेल्या रुग्णांना केस पेपरसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविले जात होते. त्या मुळे प्रत्येकाला तीन-तीन ठिकाणी चकरा मारव्या लागल्या. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जात असताना व एवढ्या प्रमाणातील प्रत्येक व्यक्तीला एकाका ठिकाणी थांबावे लागत असल्याने यात मोठा वेळ गेला. त्यामुळे सर्वच जणांची चांगलीच दमछाक झाली. एक तर अनेक जण पायाने अधू व त्यात ही फिरवाफिरव त्यामुळे दिव्यांगांचा व नातेवाईकांचा मोठा संताप झाला. दिव्यांग बांधवांना किमान एकाच ठिकाणी केस पेपर देऊन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांगांकडून केली जात होती. सकाळपासून रांगेत उभे असताना एक तर केस पेपर मिळत नसल्याने व तपासणी, इतर प्रक्रियेदरम्यान बराच वेळ जात असल्याने रांगेत उभे असलेले दिव्यांग बांधव हैराण झाले.पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा आरोपप्रमाणपत्रासाठी तपासणी व इतर प्रक्रियेसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ अशी वेळ असताना प्रत्यक्षात डॉक्टर व संबंधित कर्मचारी वेळेवर येत नसल्याने आलेल्या सर्व दिव्यांगांची प्रक्रिया पूर्ण होत नाही व दर आठवड्याला गर्दी वाढतच जाते. त्यामुळे हा गोंधळ वाढत असल्याचे दिव्यांगांचे म्हणणे आहे. १ रोजीदेखील अनेक जण रांगेत उभे असताना केस पेपर देणे बंद करण्यासह तपासणीही थांबविण्यात आल्याचे दिव्यांगांचे म्हणणे आहे.पहाटेपासून रांगादर बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधव पहाटे ५ वाजेपासूनच येऊन थांबतात. हळूहळू ही गर्दी वाढत जाऊन मोठी रांग लागते. बुधवार, १ रोजी तर अपेक्षापेक्षा जास्त गर्दी वाढली व अर्धा कि.मी.पर्यंत रांग लागली होती. पुरेसे कर्मचारी व ठरवून दिलेला पूर्ण वेळ देऊन दर आठवड्याला दिव्यांगांचे होणारे हे थांबविण्यात यावे, अशी मागणी दिव्यांग बांधवांतर्फे केली जात आहे.राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेपप्रमाणपत्र प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ््या राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कायकर्ते येऊन वेगवेगळ््या पुढाऱ्यांचे नावे सांगतात व प्रमाणपत्रासाठी आग्रह करतात. त्यामुळेही गर्दी वाढून गोंधळ होत असल्याचे काही जणांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप थांबविण्यात यावा, अशीही मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव