जळगाव : डीएलएड प्रथम वर्ष सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली असून शुक्रवारी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. प्रवेश अर्जाच्या मुदतीपर्यंत ४९७ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती डाएट कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत डीएलएड प्रथम वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्याने या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळतो. त्यामुळे काही महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच सन २०२१-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय कोट्यातील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जासाठी ९ ते २९ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदतीअंती जिल्ह्यातील ४९७ विद्यार्थ्यांनी डीएलएडच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज केले. त्यातील ३३४ अर्जांची पडताळणी झाली आहे. तर ५७ अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याच बरोबर २ अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज करणे : ९ ते २९ आॅगस्ट
- अर्जांची पडताळणी करणे : ९ ते ३० आॅगस्ट
- आक्षेप निरसन : २ सप्टेंबर
- गुणवत्ता यादी जाहीर : ३ सप्टेंबर
- प्रथम फेरी प्रवेशाची यादी जाहीर व प्रवेश घेणे : ४ ते ८ सप्टेंबर
- दुसरी फेरी प्रवेशाची यादी जाहीर व प्रवेश घेणे : ११ ते १५ सप्टेंबर
- तिसरी फेरी प्रवेशाची यादी जाहीर व प्रवेश घेणे : १८ ते २२ सप्टेंबर