शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

प.वि.पाटील व ए.टी.झांबरे विद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

================ बहिणाबाई विद्यालय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बहिणाबाई प्राथमिक, माध्‍यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्‍यात आली. या कार्यक्रमात ...

================

बहिणाबाई विद्यालय

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बहिणाबाई प्राथमिक, माध्‍यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्‍यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे अध्‍यक्ष बंडू काळे, सचिव जनार्दन रोटे, मुख्‍याध्यापक टी.एस.चौधरी, प्राथमिक मुख्‍याध्‍यापक राम महाजन व शिक्षक उपस्थित होते. सुरुवातीला बंडू काळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा खडके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याची माहिती दिली. याप्रसंगी प्रतिभा राणे, सिमा चौधरी, स्वाती कोल्हे, डॉ.विलास नारखेडे, राजेश वाणी, संतोष पाटील, विशाल पाटील, दिनेश पाटील, चंद्रकांत पाटील, पद्माकर चौधरी, शंकर चव्हाण, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, गोविंदा भोळे, जगदिश नेहते आदी उपस्थित होते.

===============

जिजामाता विद्यालयात

हरिविठ्ठल नगरातील न्यू जागृती मित्रमंडळ संचलित जिजामाता विद्यालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आर. खोरखेडे यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी शिक्षक किशोर पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर पाटील यांनी केले.

==============

संस्कृती माध्‍यमिक विद्यालय

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विवेकानंद तायडे यांच्या हस्ते करण्‍यात आले. अश्विनी फालक यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती दिली, तसेच डॉ.बाबासाहेब आंबडेकरांच्या जयंतीनिमित्त शाळेकडून ऑनलाइन पद्धतीने निबंध व वकृत्व स्पर्धा घेण्‍यात आली. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदविला होता.

==============

शिक्षणशास्त्र व शारीरिकशास्त्र महाविद्यालय

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. यावेळी प्राचार्य प्रा.ए.आर राणे, जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार, प्रा.प्रवीण कोल्हे, प्रा.केतन चौधरी, मोहन चौधरी उपस्थित होते.