शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात पुष्पक एक्सप्रेसमध्ये अवतरली ‘पुष्पा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:09 IST

मुंबईवरून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये धावत्या गाडीत भुसावळ स्थानक येण्याच्या १० मिनिटेआधी एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला व ‘पुष्पक’मध्ये अवतरली ‘पुष्पा’ असे प्रवाशांनी तिचे नाव सुचविले.

ठळक मुद्देरेल्वे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली सुखरुप प्रसूतीगाडीतील सहप्रवाशांनी केला जल्लोषमुलीचे नाव ठेवण्याचे सुचविले पुष्पा

भुसावळ, जि.जळगाव : मुंबईवरून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये धावत्या गाडीत भुसावळ स्थानक येण्याच्या १० मिनिटेआधी एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला व ‘पुष्पक’मध्ये अवतरली ‘पुष्पा’ असे प्रवाशांनी तिचे नाव सुचविले.मुंबईवरून लखनऊकडे जाणाºया गाडी क्रमांक १२५३४ पुष्पक एक्सप्रेसच्या सामान्य (महिला) डब्यामध्ये दुपारी साडेतीनला अलीना देवी (३५) ही महिला एकटीच लखनऊसाठी प्रवास करत होती. गरोदर असूनही व लखनऊला जाणेही आवश्यक असल्यामुळे अलिनादेवी अशा स्थितीमध्ये महिला डब्यामध्ये प्रवास करत होत्या. भुसावळ स्थानक येण्याच्या १० मिनिटांपूर्वी अलिनादेवी यांना अति तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्या. याची माहिती रेल्वे हॉस्पिटलचे डॉ.रविराज तेजा यांना कळविण्यात आली. तेजा यांनी क्षणाचाही विलंब न करता पुष्पक एक्सप्रेससाठी फलाट नंबर ३ गाठून या महिलेचा शोध घेतला. ही महिला डब्याय वेदनेने व्याकुळत होती. डॉ.तेजा व नर्स डोंगरदिवे यांच्या सहाय्याने मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.पी.के.सावंत राय व सहाय्यक चिकित्सा अधीक्षक डॉ.श्रवण कुमार यांच्या सहकार्याने महिलेची प्रसूती सुखरूप झाली. महिलेस कन्यारत्न प्राप्त झाले व डब्यांमध्ये सर्वांनी सुटकेसाठी श्वास घेतला व कन्यारत्न प्राप्त झाल्याने जल्लोषही केला. पुष्पक गाडीमध्ये कन्यारत्न प्राप्त झाल्याने ही मुलगी भविष्यामध्ये पुष्पक गाडीप्रमाणेच धावेल. मुलीचे नाव पुष्पा ठेवा, असा आग्रह सहप्रवाशांनी केला व गोंडस मुलीचे नाव पुष्पा ठेवण्यात आले. अशा पद्धतीने ‘पुष्पक’मध्ये अवतरली. पुष्पा या एकाच घटनेची चर्चा दिवसभर रेल्वेस्थानकावर केली जात होती.दरम्यान, अलिना देवी व पुष्पाची प्रकृती उत्तम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ