शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.संपाचा फटका, चिमुकल्याच्या ओढीने मातेची पुणे ते जळगाव दुचाकीने धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 12:18 IST

400 कि.मी.चा टप्पा गाठला साडे आठ तासात

ठळक मुद्देचिमुकल्याची ओढ  मातेला चैन पडू देईनापहाटे चार वाजताच पुणे येथून दुचाकीने निघाल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - गेल्या आठवडय़ात एस.टी. महामंडळाच्या कर्मचा:यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला. मात्र यावर मात करीत जळगावातील माहेरवाशीण असलेल्या एका विवाहितेने पोटचा गोळा जळगावात असल्याने थेट दुचाकीनेच पुणे ते जळगाव हा 400 किमीचा प्रवास स्वत: दुचाकी चालवत साडे आठ तासात पूर्ण केला व चिमुकल्याची भेट घेतल्याची घटना घडली. जळगावातील माहेर असलेली एक महिला सध्या पुणे स्थायिक असून त्या खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा भाऊ व आईदेखील पुण्यातच राहतात तर पती भारतीय नौदलात विशाखापट्टनम् येथे नोकरीला आहेत. दिवाळी सण असल्याने त्यांच्या आई, भाऊ व तीन वर्षाचा मुलगा दिवाळीच्या आठवडाभरापूर्वीच जळगावला आले. सुट्टी न मिळाल्याने त्या महिलेला त्यांच्यासोबत येता आले नाही. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी येण्याचे त्यांनी ठरविले. पहाटे चार वाजताच पुणे येथून दुचाकीने निघाल्या. या वेळी त्यांनी पँट, शर्ट व हेल्मेट अशा पुरुषी वेषात प्रवासास सुरुवात केली. कोठेही न डगमगता त्यांनी धाडसाने प्रवास  केला. कुटुंबियांना त्रास नको म्हणून त्या महिलेने नाव न देण्याची विनंती ‘लोकमत’ला केली.ज्या वेळी त्यांनी येण्याची तयारी केली त्या वेळी एस.टी. कर्मचा:यांचा संप होता. त्यात ट्रॅव्हल्स फुल्ल व भाडे भरमसाठ. तेवढे पैसे देऊनही जागा मिळत नव्हती. त्यामुळे चिमुकल्याची ओढ मातेला चैन पडू देत नव्हती. त्यामुळे या मातेने थेट  दुचाकीनेच जळगाव गाठायचा निश्चय केला.