मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यात आॅगस्ट महिन्यात अति पावसामुळे उडीद, मूग पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी महसूल आणि पंचायत समिती यंत्रणा कामाला लागली आहे. ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक नेमणूक करण्यात आले असून, प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.८१ गावांमधील नुकसानीच्या पंचनामे कामी चार महसुली मंडळात प्रत्येक गावात पथकातील एक कर्मचारी स्वतंत्ररित्या पंचनामे करणार आहेत. यासाठी चार मंडळ अधिकारी, २१ तलाठी, १६ कृषी सहाय्यक आणि ३४ ग्रामसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे.यंदा पंचनामे करताना जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येऊन नुकसानीच्या शेती क्षेत्राचे जीपीएस वापरून फोटो काढून नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहे.
्नमुक्ताईनगरला उडीद, मूग नुकसानीचे पंचनामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:23 IST