शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

समांतर रस्त्यांसाठी गडकरींना घालणार साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:44 IST

एक नागरिक मंचचा पुढाकार : मनपा आयुक्तांकडून घेतली माहिती; उद्या जाहीरसभा

जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही पावले उचलली जात नसल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल़े आता या समांतर रस्त्यांसाठी एक नागरिक मंचने पुढाकार घेतला असून यासाठी मंचचे पदाधिकारी केंद्रीयभूप्रृष्ठमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालणार आह़े याच विषयावर मंचतर्फे 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जयप्रकाश नारायण चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आह़ेराष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आह़े या महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तरूणांचा अधिक समावेश आह़े खोल साईडपट्ट्या, महामार्गावरील खड्डे, अरूंद रस्ता यामुळे अपघातात नाहक निष्पांपाचा बळी जात आह़े  सर्वपक्षीय तसेच संस्था पदाधिका:यांनी जिल्हाधिका:यांना निवेदन देवून दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या समस्येवर पर्यायी उपाययोजनेसाठी साकडे घातले होत़े यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अधिका:यांच्या बैठक घेवून समांतर रस्त्याचा विषयाला हात घालण्यात आला़ जैन इरिगेशनच्या सहकार्याने महापालिका प्रशासनातर्फे राष्ट्रीय महामार्गालगत अभियांत्रिकी महाविद्यालय ते अग्रवाल चौक व चौफुली, इच्छादेवी ते अजिंठा चौफुली या समांतर रस्ते सपाटीकरणाचे काम केल़े काही दिवसानंतर हे काम थांबले. आता सपाटीकरण झालेल्या जागेवर अतिक्रमणे वाढत आहेत. आयुक्तांकडून घेतली माहितीसमांतर रस्त्यांसाठी नागरिकांनी एकत्र यावे, जनजागृती व्हावी, यासाठी मंचतर्फे 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जयप्रकाश नारायण चौक, नवीपेठ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आह़े यात नागरिकांच्या तक्रारी तसेच मते जावून घेवून समांतर रस्त्यांसाठी पुढची दिशा ठरविण्यात येणार आह़े या समांतर रस्त्यांबाबतच्या आवश्यक माहितीसाठी गुरूवारी विराज कावडीया, विनोद देशमुख, मितेश गुजराथी, मुविकराज कोल्हे या पदाधिका:यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेतली़समांतर रस्ते महामार्ग विभागाकडून पालिकेकडे वर्ग करण्यात आलेले नाहीत़ वर्ग झाल्यावरही बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मनपा हे काम करू शकत नाही, असे आयुक्तांनी पदाधिका:यांना सांगितल़े आता माहिती अधिकारात कागदपत्रे मिळवून लवकरच  नितीन गडकरी यांची भेट घेणारअसल्याचेविराजकावडीयायांनीलोकमतलासांगितल़ेशहरातून जाणा:या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण मोठे आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन प्रस्तावित समांतर रस्त्यांसाठी आपण सहा वर्षापासून पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी उपोषण केले, महापालिकेच्या सभागृहात विषय गांभीर्याने मांडला पण उपयोग झाला नाही. त्यामुळे या लढय़ात जनसहभाग असावा या उद्देशाने आता लोकांना बरोबर घेऊन समांतर रस्त्यासाठी पाठपुरावा  करीत आहोत. एक नागरिक मंच हा जनतेचा असेल. त्यात कोणीही राजकारणी नाही. लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा दबाव आणण्याचा या माध्यमातून प्रय} असून सभेस नागरिक येऊन भविष्यात नियोजन ठरविले जाईल.    -अनंत जोशी, नगरसेवकसमांतर रस्ते हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. रस्त्यांसाठी जागा आहे, काही ठिकाणी रस्ते अस्तित्वातही आहेत पण काही ठिकाणी गायब झाले आहेत. हा रस्ता नियोजनानुसार पूर्ण व्हावा असेच आमचे प्रय} आहेत. हा विषय एकटय़ा व्यक्तीच्या पुढाकारातून निश्चितच होणार नाही. त्यामुळे सभा घेऊन जनजागृती करणे हा प्रमुख उद्देश आमचा आहे. चौपदरीकरण, उड्डाणपूल, सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे रूंदीकरण असे किती तरी आश्वासन मिळाले असले तरी प्राधान्य हे समांतर रस्त्याला असून आमचा त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.        -विराज कावडियाशहरातून जाणा:या महामार्गावर प्रमुख चौकात उड्डाणपूल होणार, महामार्ग रूंद केला जाणार, चौपदरीकण होणार या घोषणा आता स्वपAवत वाटू लागल्या आहेत. ते होईल तेव्हा होईल पण मग तोर्पयत निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ द्यायचे काय? असा माझा शहरवासीयांना सवाल असून त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन लढा पुकारणे हाच मुळ उद्देश आहे. रस्ते पक्के होऊ शकत नसतील तरी ठिक पण कच्चे रस्ते करून ते सलग असावेत अशी अपेक्षा आहे.  आमची सभा ही समांतर रस्ते व्हावेत या साठीच आहे. त्यासाठी प्रथम नागरिकांची बोलावून सभा घेणे, त्यानंतर भविष्यातील धोरण ठरविले जाईल.      -पियुष पाटील.