शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

आधी खड्डे बुजवा, तरच भुयारी गटारीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 13:21 IST

जळगाव : अमृत अंतर्गत जून २०१७ मध्ये मंजूर झालेल्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचा कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. ...

जळगाव : अमृत अंतर्गत जून २०१७ मध्ये मंजूर झालेल्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचा कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. शिवाजीनगर भागातून या कामाला सुरुवात होणार होती. मात्र, भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे व अ‍ॅड. दिलीप पोकळे यांनी आधी पाणी पुरवठा योजनेतंर्गत झालेल्या खड्डयांची दुरुस्ती करा त्यानंतरच भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात करा अशी तंबी दिली. त्यामुळे मक्तेदारही काम करण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे.अमृत योजनत भुयारी गटारीच्या कामाचे भूमिपूजन आॅगस्ट महिन्यात झाले. मात्र, दोन महिन्यांपासून पाईपलाईन खोदण्याचा कामाला सुरुवात झालेली नाही. या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्याचे काम शिवाजीनगर भागातून सुरु होणार आहे. अमृत योजनेमुळे आधीच रस्त्यांची समस्या बिकट झाली आहे. त्या व्यतिरिक्त मनपाकडूनही मुख्य रस्त्यांची दुरुस्ती होत नाही.अशा परिस्थितीत भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात झाली. तर रस्त्यांचे पुन्हा खोदकाम केले जाणार आहे. त्यामुळे रहिवाश्यांना पुन्हा त्रास सहन करावा लागणार आहे. या कामाला सुरुवात करण्याआधी खोदकाम झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची व्यवस्था, त्यासाठीचा निधी मंजूर करूनच कामाला सुरुवात अशी तंबी प्रभाग क्रमांक १ व २ मधील नगरसेवकांनी मक्तेदाराला दिली आहे.पहिल्या टप्प्यात या भागात होणार काम१४३ कि.मी होणाऱ्या पहिल्या टप्प्याचा कामात शहरातील दुध फेडरेशन इंद्रप्रस्थ नगर, खडके चाळ, शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन पासून कांचन नगर, शंकर अप्पा नगर, ज्ञानदेव नगर, कालींका माता चौक, अजिंठ चौक, मेहरूण, मोहाडी रोड, मोहन नगर, गणपती नगर, आकाशवाणी चाौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक व नेहरू चौक पर्यंतच्या येणाºया सर्व मधल्या भागात पहिल्या टप्प्याचे काम होणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने शहरात काम होणार आहे.प्रशासनाकडून पाहिजे हमी... अमृत पाणी पुरवठा योजनेतंर्गत रस्त्यांचे खोदकाम झाले. मात्र, व्यवस्थितपणे या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे. भुयारी गटार योजनेतंर्गत मुख्य रस्त्यांचा मधोमध ३ ते ६ फुटाचे खोदकाम केले जाणार आहे. हे खोदकाम झाल्यानंतर पुन्हा दुरुस्तीसाठी मक्तेदार लक्ष देत नाही. त्यामुळे शुक्रवारी होणाºया स्थायी समितीच्या सभेत मनपाकडून खोदकाम झाल्यानंतर तत्काळ डांबरने रस्त्यांची दुरुस्तीचे आश्वासन मिळाले तरच या योजनेच्या कामाला सुरुवात करू देवू असा इशारा नगरसेवक नवनाथ दारकुंडे व अ‍ॅड.दिलीप पोकळे यांनी दिला आहे.३० महिन्यांपैकी २ महिने गेले वायाअहमदाबाद येथील एलसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीला ही निविदा देण्यात आली आहे. ३० महिन्यात हे काम पुर्ण करायचे आहे. मात्र, त्यापैकी २ महिने होवूनही कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आता २८ महिन्यात हे काम पूर्ण करावे लागणार आहे. भुयारी गटार योजनेला २०१६ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, निविदांच्या घोळमुळे तब्बल दोन वर्षानंतर या कामासाठी निविदा देण्यात आली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव