शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

तापीपूर्णा जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती अयोध्येला नेण्यासाठी शनिवारी पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 15:32 IST

तापीपूर्णा जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती अयोध्येला नेण्यासाठी शनिवारी पूजन करण्यात येणार आहे.

मुक्ताईनगर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर भूमिपूजन कार्यक्रमास अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ आश्रम फैजपूर येथील महामंडलेश्वर प.पू. जनार्दन हरीजी महाराज यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. तापी-पूर्णा संगमावरील पवित्र जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील पवित्र माती शनिवार, १ आॅगस्ट रोजी विधीवत पूजनाने जनार्दन हरीजी महाराज यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.याबाबत जुने मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव महाराज जुणारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे चार धामपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताई समाधीस्थळाची माती जी संत मुक्ताई सातशे वर्षांपूर्वी विजेच्या रूपात अंतर्धान ज्या भूमीत झाल्या व जेथे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ थोर संत प.पू. जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, धोंडोपंतदादा, सद्गुरू झेंडूजी महाराज, सद्गुरू सखाराम महाराज अनेक थोर महापुरुषांनी येथील रजकण आपल्या भाळी लावून ज्या भूमीला नतमस्तक झाले अशी पवित्र माती व चांगदेव येथील तापी-पूर्णा संगमाचे पवित्र जल शनिवारी सकाळी ११ वाजता महामंडलेश्वर प.पू.जनार्दन हरीजी महाराज, श्री संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, ह.भ.प. रवींंद्र महाराज हरणे यांच्या हस्ते विधीवत पूजन करून संकलीत करण्यात येणार आहे. संपूर्ण खानदेश, विदर्भातील रामभक्तांच्या वतीने प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज संत मुक्ताबाई भूमीतील पवित्र जल व माती घेऊन अयोध्येकडे प्रस्थान करणार आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर