शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:37 IST

भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी शिवारातील एका भूखंडाच्या गेटचे कुलूप तोडून या जागेत बेकायदा घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्देआरपीआय जिल्हाध्यक्षासह २५-३० जणांविरुद्ध गुन्हा दाखलअनधिकृत प्रवेश करून तोडले झाड

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी शिवारातील एका भूखंडाच्या गेटचे कुलूप तोडून या जागेत बेकायदा घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी सुनील रमेश अग्रवाल (रा.एस.के आॅईल मिलजवळ) यांनी फिर्याद दिल्यावरून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आरपीआय )चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, कंडारी शिवारातील शिवारातील गट क्रमांक १५९/१/२ मधील २०.५८ चौरस मीटर क्षेत्र हे सुशीलाबाई किसनलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले आहे. यासंदर्भात न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट असून, मंगळवारी न्यायालयात चौकशी ठेवण्यात आली होती. चौकशीदरम्यान जागा आहे तशीच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र तरीही संशयित आरपीआय जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम हे जेसीबीसह २५-३० महिला व पुरुषांना घेऊन त्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व चाळीस वर्षांपूर्वीची निलगिरीची दोन व कडुनिंबाचे एक झाड तोडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केले, अशी फिर्याद अग्रवाल यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिली आहे. या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला सूर्यवंशी व निकम यांच्यासह इतरांवर गुन्हा रजिस्टर नंबर ४५७/१८, भा.दं.वि. कलम १४१, १४३, १४७, १५२, ४४७, ४२७ व ३४ प्र्रमाणे तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधात्मक कायदा १९८४ कलम ३ क्रिमिनल कायदा कलम ७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जोशी करीत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ