शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

जनता कर्फ्युला व्यापाऱ्यांची साथ, नागरिकांकडून ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 10:49 IST

मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद : रस्त्यांवर मात्र वाहनांची गर्दी; दुसºया दिवशी संमिश्र प्रतिसाद

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपा प्रशासनाकडून सोमवारपासून शहरात प्रभागनिहाय जनता कर्फ्यू पाळला जात आहे. जनता कर्फ्यूचा दुसºया दिवशी प्रभाग ४, ५ व ६ मध्ये हा कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र, कर्फ्यू दरम्यान मुख्य बाजारपेठ व इतर कॉलनी भागातील सर्व दुकाने बंद ठेवत व्यापारी बांधवांनी १०० टक्के या कर्फ्यूला पाठिंबा दिला. मात्र, बाजारपेठेतील एकही दुकान उघडे नसतानाही मुख्य बाजारपेठ भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फिरणाºया नागरिकांनी जनता कर्फ्यूला ठेंगा दाखविल्याचे चित्र दुसºया दिवसाच्या कर्फ्यूमध्ये दिसून आले.प्रभागनिहाय जनता कर्फ्यूचा मंगळवारी दुसरा दिवस होता. त्यानुसार प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ या तीन प्रभांगामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात आला. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठेचा सर्व परिसर प्रभाग क्रमांक ५ मध्येच येत असल्याने बाजारपेठेतील सर्व मार्केटमधील दुकाने, रस्त्यालगतची दुकाने व विविध अस्थापने देखील या जनता कर्फ्यूदरम्यान बंद ठेवण्यात आली होती. मात्र, असे असतानाही मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. जनता कर्र्र्र्फ्यू असला तरी मार्केट उघडे असतील या आशेने नागरिक मुख्य बाजारपेठेतील मार्केट परिसरात येवून पाहणी करत होते. त्यामुळे जनता कर्फ्यू असतानाही बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून आली.मार्केट परिसर संपूर्ण बंद... महापालिकेने मध्यवर्ती भागात गर्दी होवू नये म्हणून २८ रस्ते सील केले आहेत. त्यातच मंगळवारी या भागातच जनता कर्फ्यू असल्याने सुभाष चौक, सराफ बाजार, दाणा बाजार, फुले मार्केट, गांधी मार्केट, नवीपेठ, गोलाणी मार्केट परिसरातील सर्वच दुकाने बंद ठेवून व्यापारी बांधवांनी १०० टक्के या कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदविला. अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आल्याने दुपारी नागरिकांच्या वर्दळीत देखील घट झाली होती. दरम्यान, गोलाणी मार्केट परिसरात दुकाने बंद ठेवून मोबाईल विक्री करणाºया सात जणांवर मनपाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. यासह काही भाजीपाला विक्रेत्यांचाही माल जप्त करण्यातअनेक दुकानांबाहेर दुकानदार गर्दी करून उभेजनता कर्फ्यू जरी असला तरी प्रशासनाने मार्केट उघडण्यास दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली असल्याने मंगळवारीही प्रशासनाकडून मार्केट उघडण्यास परवानगी दिली असेल या आशेने अनेक व्यापारी व दुकानदार आपआपल्या दुकानांबाहेर उभे होते. तसेच प्रशासनाकडून दुपारी १ पर्यंत दुकाने उघडण्याबाबत काही आदेश येतील अशी अपेक्षा अनेक दुकानदारांना लागली होती. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणतेही आदेश न घेतल्याने दुकानदारांनी काढता पाय घेत घरी परतले.कॉलनी, गल्ली बोळात मात्र कडक कर्फ्यूप्रभाग क्रमांक ५ मध्ये बहुतांश भाग बाजारपेठेचा आहे. त्यातच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची कार्यालये देखील याच प्रभागात असल्याने नागरिकांची गर्दी या भागात त्यामुळे बाजारपेठ भागात मार्केट बंद असूनही नागरिकांची गर्दी झाली होती. याव्यतिरीक्त या तिन्ही प्रभागात येणाºया पांडे चौक परिसर, शाहू नगर, प्रताप नगर, गांधी नगर, बळीराम पेठ, आर.आर.विद्यालय परिसर, हौसिंग सोसायटी परिसर, विसनजी नगर, जयकिशनवाडी, राधाकिसनवाडी, तायडे गल्ली याभागात मात्र कर्फ्यू चांगल्या प्रकारे पाळण्यात आला.दुपारी बाजारातील गर्दी झाली कमीमुख्य बाजारपेठ दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र, बाजारपपेठेतील सर्व व्यवसाय बंद असल्याने नागरिकांचीही गर्दी हळूहळू झाली. दुपारी २ वाजेनंतर मुख्य बाजारपेठ भागात गर्दी, वाहनांची वर्दळ क मी झाली होती. बळीराम पेठ, चित्रा चौक, गोलाणी मार्केट परिसरात दुपारी ३ वाजेनंतर शुकशुकाट पहायला मिळाला.बुधवारी या भागात होणार जनता कर्फ्यूप्रभाग क्रमांक ७ - महेश प्रगती परिसर, अजय कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, गणेश कॉलनी, शिव कॉलनी, आर.एम.एस. कॉलनी, रिंगरोड परिसर, कृषी कॉलनीप्रभाग क्रमांक ८ -भोईटे नगर, म्हाडा कॉलनी, शांती नगर, प्रज्ञा कॉलनी, हायवेदर्शन कॉलनी, दादावाडी परिसर, खोटेनगर, वैष्णवी पार्क, व्दारका नगर, वाटिकाश्रम.प्रभाग क्रमांक ९ - मुक्ताईनगर, द्रौपदी नगर, दांडेकरनगर, ओमशांती नगर, पाढंरी प्लॉट परिसर, शिंदे नगर, मानव शाळा परिसर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव