शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

लाभार्थ्यांना 'ऑफलाईन' धान्य द्या; RPI तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By सागर दुबे | Updated: August 22, 2022 18:53 IST

धान्य विरतणात पारदर्शकता येण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जात असला तरी अनेकदा सर्व्हर डाऊनमुळे धान्य दुकानात उपलब्ध असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित रहावे लागते.

सागर दुबे जळगाव : स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशिन सर्व्हर डाऊनमुळे बंद आहे. परिणामी, गेल्या पंधरा दिवसापासून धान्याचा पुरवठा होत नसून  शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे ई-पॉस मिशिनची तातडीने दुरूस्ती करून धान्याचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकांनी जोरदार निदर्शने केली.

स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरणासाठी ई-पॉस या बायोमेट्रीक प्रणालीचा वापर केला जातो. धान्य विरतणात पारदर्शकता येण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जात असला तरी अनेकदा सर्व्हर डाऊनमुळे धान्य दुकानात उपलब्ध असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित रहावे लागते. सततच्या या समस्येमुळे शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य घेणा-या लाभार्थ्यांची गर्दी हात असते. परंतू, सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरणाचे काम ठप्प पडते. दुकानातील ई-पॉस मशिनमध्ये वारंवार बिघाड होणे, हाताचे ठसे न उमटणे, नेटवर्क न येणे, मशिन बंद पडणे या अडचणींमुळे लाभार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.

त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे ई-पास मशिन बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना ऑफलाईन धान्य वाटप करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना नागरिकांनी जिल्हापुरवठा अधिकारी यांना घेराव घालून समस्या मांडल्या. यावेळी आंदोलनात प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, सागर सपकाळे, संदीप तायडे, किरण अडकमोल, आकाश पान पाटील, संतोष कोळी, सुभाष पाटील, अशोक वानखेडे, रतन भोसले, शबाना खाटीक, नजमा शेख, जरीना पठाण, संतोष कोळी, गुलाल बाविस्कर, कादर शेख, नफिसा अली, जायदा खान, रईसा शेख आदींची उपस्थिती होती.