शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

निधी उपलब्धतेनुसार 100 टक्के कर्ज देणार, खासदार राजू शेट्टी यांच्या ‘ठिय्या’ नंतर आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:37 IST

शेतकरी सन्मान अभियान

ठळक मुद्देबँकेचे लेखी आश्वासन लेखी आश्वासनानंतर परतले आंदोलक

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 3 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ‘शेतकरी सन्मान अभियान’अंतर्गत खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतक:यांनी जिल्हा बँकेत जाऊन 50 टक्के कर्ज देण्याच्या धोरणाविरोधात ठिय्या आंदोलन केले. अखेर बँकेच्या कर्ज विभागाच्या सरव्यवस्थापक एम.टी. चौधरी यांनी निधी उपलब्धतेनुसार संचालक मंडळाच्या संमतीने 100 टक्के कर्ज देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ‘शेतकरी सन्मान अभियान’ अंतर्गत खासदार राजू शेट्टी यांचे दुपारी 12.30च्या सुमारास जिल्हा बँकेत आगमन झाले.  यावेळी त्यांच्यासमवेत शेतकरी सुकाणू समितीचे एस.बी. पाटील, शेतकरी सन्मान अभियानाचे समन्वयक गजानन पाटील जालना व पदाधिकारी, कार्यकर्ते होते.बँकेने अपमान योजना सुरू केलीयावेळी अधिका:यांनी  बँकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असून 100 टक्के कर्ज दिले तर बँक अडचणीत येऊन कर्मचा:यांचे पगार अदा करणे देखील मुश्कील होईल, असे सांगितले. त्यावर खा.राजू शेट्टी यांनी कजर्वसुलीसाठी आवाहन करा, शेतकरी तुम्हाला सहकार्य करतील, मात्र 50 टक्केच कर्ज देणार हा शेतक:याचा अपमान आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना काढलेली असताना त्याचा लाभ मिळालेल्या शेतक:यासाठी मात्र बँकेने ही अपमान योजना सुरू केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सुमारे 1 लाख शेतक:यांचा हा विषय असून त्यांना बँकेने 50 टक्केच कर्ज देण्याची भाषा केली तर त्या शेतक:यांची बाजारात पत घसरते. कजर्माफीमुळे जिल्हा बँकेला 600 कोटी रूपये मिळाले आहेत. त्यामुळे बँकेने शेतक:यांना पूर्ण कर्ज द्यावे.  लगेच सर्व 1 लाख शेतक:यांना कर्ज द्यावे, अशी मागणी नाही. तर जसजसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार पूर्ण कर्ज देण्याची मागणी करण्यात आली. प्रक्रिया उद्योग, कारखान्यांचे कर्ज वसुल कराखासदार शेट्टी म्हणाले की, जिल्हा बँकेने सहकारी, खाजगी साखर कारखान्यांना, सुतगिरणी, केळी प्रक्रिया उद्योगांना कर्ज दिले आहे. त्याची सक्तीची वसुली करावी. त्यासाठी शेतकरी मदत करेल. त्यावर बँकेच्या अधिका:यांनी जिल्हा बँकेने यापूर्वीच कजर्वसुलीसाठी काही साखर कारखान्यांची विक्री केली आहे. तसेच वसाकाची विक्री प्रक्रिया सुरू आहे. जे.टी. महाजन सूतगिरणी विक्रीसाठी 5 वेळा निविदा काढण्यात आली. आता जागा व मशिनरी विक्रीची प्रक्रिया स्वतंत्रपणे केली जाणार असल्याचे सांगितले. बँकेच्या अडचणीबाबत खासदार शेट्टी करणार पाठपुरावायावेळी बँकेच्या अधिका:यांनी बँकेची 1300 कोटींची थकबाकी आहे. नाबार्ड 5 टक्के दराने राज्य सहकारी बँकेमार्फत निधी देते. मात्र राज्य बँक जिल्हा बँकेला पैसे देण्यासाठी तेवढीच ठेव ठेवण्याची सक्ती करते. त्यामुळे जिल्हा बँकेला राज्यबँकेकडून 9.5 टक्कय़ांनी निधी मिळतो. तर जिल्हा बँकेला मात्र 6 टक्केच व्याज राज्य बँक देते. ही अडचण ऐकल्यावर खासदार शेट्टीही आश्चर्यचकित झाले. याबाबत पत्र द्या. मी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार करून पाठपुरावा करतो, तसेच नाबार्डच्या चेअरमनला विनंती करतो.  असे सांगितले. तर राज्य बँकेने स्वतंत्र व्हावेखासदार शेट्टी म्हणाले की, जर राज्य सहकारी बँक जिल्हा बँकांच्या कामात अडथळे आणत असेल तर राज्य बँकेने वेगळे व्हावे. जिल्हा बँकांशी संबंध तोडून टाकावे. नाबार्डने थेट जिल्हा बँकेला पतपुरवठा करावा.लेखी आश्वासनानंतर परतले आंदोलकखासदार राजू शेट्टी व कार्यकत्र्यानी जिल्हा बँकेने एकदम कर्ज द्यावे, अशी मागणी नाही. मात्र जसजसा निधी उपलब्ध होईल, तसतसे संचालक मंडळाच्या मंजुरीने 100 टक्के कर्ज देण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. बराच वेळ चर्चा झाल्यावर अखेर स्वाभिमानीतर्फे मागणीचे निवेदन द्यावे व त्यावर बँकेकडून आरबीआय व नाबार्डच्या नियमांनुसार व जसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार कर्ज देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलक जिल्हा बँकेतून शासकीय विश्रामगृहावर परतले.कर्मचारी संघटनेतर्फे सत्कारयावेळी जिल्हा बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव