ऑनलाइन लोकमतपाचोरा, जि. जळगाव, दि. 19 - सत्यपाल महाराज यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा परिवर्तनवादी विचारांवर हल्ला असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी पाचोरा येथे निषेध सभेत केली. या वेळी सत्यपाल महाराज यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. हुतात्मा स्मारकामध्ये पुरोगामी संघटनेच्यावतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. यात माजी आमदार दिलीप वाघ यांनी या हल्याचा निषेध व्यक्त करीत सुधारणावादी विचारांवर सतत होणारे हल्ले ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. यावेळी खलील देशमुख, नगरसेवक विकास पाटील, सचिन सोमवंशी, प्रवीण ब्राम्हणे यांनीही आपल्या मनोगतातून या घटनेचा निषेध व्यक्त केला. नगरसेवक अशोक मोरे, राजू भोसले, अशोक संघवी, प्रा. वैशाली बोरकर यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सत्यपाल महाराज यांच्यावरील हल्ल्याचा पाचोरा येथे निषेध
By admin | Updated: May 19, 2017 17:18 IST