शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात प्रस्तावित रस्त्याची जागा अप्पर आयुक्तांनी परस्पर दिली हॉकर्सना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:43 IST

मनपाने खटला लढून अनेक वर्षानंतर मिळवली होती जागा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13- काव्यर}ावली चौकातील पोलीस अधीक्षक बंगल्या नजीकची जागा मोठा वाद, कोर्टातील संघर्षानंतर मनपाने ताब्यात घेतली मात्र ही जागा परिसरात व्यवसाय करणा:या 18 हॉकर्सना देण्याचा निर्णय मनपा अपर आयुक्तांनी परस्पर घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या डीएसपी बंगल्याला लागून असलेल्या रस्त्याच्या जागेत पोलीस प्रशासनाचे बांधकाम होते. कर्मचा:यांचे क्वार्टर व वॉलकंपाऊंड होते. ही जागा ताब्यात मिळावी म्हणून महापालिकेला उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली होती. न्यायालयानेही पोलीस प्रशासनाला ही जागा रिकामी करून देण्याचे आदेश केले होते. त्यानंतरही जवळपास एक वर्ष ही जागा पोलीस प्रशासनाच्या ताब्यात होती. याबाबत ‘लोकमत’ ने पाठपुरावा केल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना आदेश करून ही जागा मनपाला देण्याचे आदेश केले होते. त्यानंतर ही जागा मनपाच्या ताब्यात आली. रिकामी जागा हॉकर्सनारस्त्यासाठी महत्प्रयासाने ताब्यात घेतलेल्या या जागेवर आरटीओकडील एजंट व वाहनांची जत्रा भरत होती. त्यावर आणखी कडी म्हणजे आता ही जागा परिसरात व्यवसाय करणा:या 18 हॉकर्सना देण्याचा निर्णय झाला आहे. अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी या ठिकाणी भेट देऊन ही जागा हॉकर्सना देण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी जेसीबीने सपाटीकरणाचे कामही मनपाने करून दिले. परस्पर निर्णयहॉकर्सच्या पर्यायी जागांचे सर्व निर्णय मनपाच्या सभेत झालेले असताना अपर आयुक्तांनी परस्पर निर्णय कसा घेतला?  रस्त्यावरील हॉकर्स पर्यायी जागेवर हलविणे मनपाला शक्य होत नसताना रस्त्यासाठी संपादित जागेवर हॉकर्सचे स्थलांतर कशासाठी? रस्त्याचे काम करण्याऐवजी प्रशासन त्यावर अतिक्रमणाची परवानगी कशी देते? असा सवाल उपस्थित झाला आहे.आरटीओ कार्यालयाच्या रस्त्यावर खाद्य पदार्थाच्या गाडय़ा लागत असत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून या हाकर्सना तात्पुरत्या स्वरुपात ही जागा देण्यात आली आहे. नंतर हाकर्स समितीने जागांची निश्चिती केल्यावर तेथे या हॉकर्सना हलविले जाईल. -राजेश कानडे, अपर आयुक्त, मनपा.