शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करावरून प्रशासन व सत्ताधारी आमने-सामने ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:20 IST

जळगाव : गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने व्यापारी असो वा खासगी नोकरदार वर्ग, सर्वांनाच आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. ...

जळगाव : गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने व्यापारी असो वा खासगी नोकरदार वर्ग, सर्वांनाच आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या रक्कमेत ५० टक्के सुट देण्यात यावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. मात्र, ही मागणी मान्य करण्यास प्रशासन तयार नसल्याने आता सत्ताधाऱ्यांकडून येत्या महासभेत मालमत्ताकराच्या रक्कमेवर ५० टक्के सुटचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेकांचे रोजगार या काळात गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मालमत्ताकराच्या रक्कमेत नागरिकांना ५० टक्के सुट द्यावी अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. याबाबत अनेक नगरसेवकांनी मनपा आयुक्तांना निवेदन व पत्र देखील सादर केले आहेत.मालमत्ताकराच्या रक्कमेत ५० सुटबाबत अद्याप कोणत्याही महापालिकेने निर्णय घेतला नसल्याचे सांगत, याबाबत अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी घेतली होती.मनपाही अडचणीततसेच लॉकडाऊनमुळे मनपाही आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे मालमत्ता करात ५० टक्के सुट दिल्यास मनपाची आर्थिक स्थिती बिघडेल म्हणून मनपा मालमत्ताकराच्या रक्क मेत सुट देण्यास अनुत्सूक आहे.दरम्यान, महासभेआधी या विषयावर तोडगा काढण्यासाठी काही पदाधिकारी आग्रही असून, ५० टक्के सुट न देता मनपाचेही आर्थिक नुकसान होणार नाही व नागरिकांवरही बोझा पडणार नाही असा प्रस्ताव सादर करण्याचीही तयारी असल्याची माहिती भाजपच्या काही नगरसेवकांनी ‘लोकमत’ ला दिली.दोन महिन्यात ११ कोटींची वसुलीलॉकडाऊनमुळे महापालिकेने वसुलीची मोहिम थांबवली होती. एप्रिल व मे महिन्यात मनपाचीही एकही रुपयाची वसुली करण्यात आली नाही. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर १ जूनपासून मनपाकडून वसुली सुरु करण्यात आली. २५ जुलै अखेरपर्यंत महापालिकेची ११ कोटी ३ लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी आकाश डोईफोळे यांनी दिली.सत्ताधाºयांकडून होणार प्रस्ताव सादर,शिवसेनेचाही पाठिंंबा-प्रशासनाकडून हा प्रस्ताव सादर केला जाणार नसल्याने आता सत्ताधाºयांकडून हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच या प्रस्तावाला शिवसेनेचाही पाठींबा राहणार असल्याची माहिती मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली.-सत्ताधारी व विरोधकांचाही पाठींबा असल्याने हा प्रस्ताव बहूमताने मंजुर होणार हे निश्चित आहे.-मात्र, मनपाचे आर्थिक नुकसान होणार असल्याने प्रशासनाकडून हा ठराव विखंडनासाठीही पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन व सत्ताधारी आमने-सामने आले आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव