शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रगती नि कर्तबगारीची मोहोर : मेहेरगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:59 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मेहेरगावाविषयी लिहिताहेत अमळनेर येथील ‘लोकमत’चे वार्ताहर डिगंबर महाले...

अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हातात हात घेऊन गावाच्या विकासाचा संकल्प केला तर काय विकास घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण मेहेरगावने जळगाव जिल्ह्यात निर्माण केले आहे.९२२ लोकसंख्या असलेल्या अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव या गावात शुद्ध आर. ओ. पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था, मोफत पिठाची गिरणी, सुसज्ज अभ्यासिका, व्यायामशाळा, गावातील रस्त्यांचे १०० टक्के काँक्रीटीकरण, संपूर्ण गावात एल.इ.डी. दिव्यांची व्यवस्था, १०० टक्के भूमिगत गटारी, प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर व अधिकृत वीज जोडणी, चौकाचौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, डिजिटल अंगणवाडी, पेपरलेस ग्रामपंचायत, ९० टक्के ग्रामस्थांकडे व्यक्तिगत शौचालय, सात सार्वजनिक शौचालये, जि. प.शाळा, संपूर्ण गाव व्यसनमुक्त एवढेच नव्हे आता हे गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले आहे. लवकरच सौर ऊर्जेच्या साहाय्याने सर्वांना मोफत गरम पाणी मिळणार आहे. पिठाची गिरणी व शुद्ध पाणीपुरवठा यंत्रणेसाठीही लवकरच सौर ऊर्जा साधने बसविली जाणार आहेत.याचा एकूणच परिपाक म्हणून १९१७-१८ मध्ये स्मार्ट गाव स्पर्धेत गावाने अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यापोटी गावाला १० लाख रुपये मिळाले होते. संत गाडगेबाबा अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम व विभागात चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. त्यापोटी गावाला सहा लाख ३० हजार रुपये मिळाले होते. पाणी फाउंडेशन स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला होता. त्यापोटी गावाला चार लाख रुपये मिळाले होते. आता समृध्द ग्राम स्पर्धेसाठीही गावाने सहभागी होऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवून गाव आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी ग्रामसभेत संपूर्ण गावाने शपथ घेतली आहे.मेहेरगाव लवकरच राज्यभर चर्चेतमेहेरगाव येथील विकासाची गाथा आज प्रत्यक्ष पाहता आली. राज्यातील आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा यांच्या पावलांवर पाऊल ठेवत मेहेरगावाच्या विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात गावातील सर्व माता भगिनींचे बँक खाते उघडून शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी खासदार उन्मेष पाटील स्वत: प्रयत्न करणार आहेत.छाया शरद पाटील गावच्या सरपंच आहेत. बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. पती शरद पाटील व ग्रामस्थांची त्यांना भक्कम साथ आहे. गावाच्या भरभराटीत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.-डिगंबर महाले, अमळनेर

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmalnerअमळनेर