शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्सची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 20:04 IST

जळगाव : संपूर्ण जग कोविड १९ सारख्या संसर्गजंन्य रोगा सोबत लढत आहे. या रोगाची लागण आपल्या शहरात पोहचू नये ...

जळगाव : संपूर्ण जग कोविड १९ सारख्या संसर्गजंन्य रोगा सोबत लढत आहे. या रोगाची लागण आपल्या शहरात पोहचू नये यासाठी डॉक्टरासह, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार व आदी कोरोना फायटर्स आपले कर्तव्य बजावत आहे. या कोरोना फायटर्सची सुरक्षितता जपली जावी या हेतूने जी.एच. रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ई अ‍ॅण्ड टीसी विभागाकडून उपलब्ध संसाधान आणि साहित्यामधून कोरोनापासून संरक्षणासाठी तंञज्ञानाचा सहाय्याने पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्सची निर्मिती करण्यात आली आहे.डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी व आदी कोरोना फायटर्स आपल्या कामावर येतात व काम संपल्यावर घरी जातात तेव्हा त्यांच्या अंगावरील पीपीई कीट, घड्याळ, मोबाईल, व अन्य साहित्य या पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्समध्ये ठेवल्यास खात्रीने ते साहित्य निजंर्तुक होणार आहे व या कोरोना फायटर्सना आपली व आपल्या कुटुंबासहित इतरांची सुरक्षा जपण्यास मदत होईल. हा बॉक्स अल्ट्रा वायोलेट किरणाचा वापर करुन बॅक्टेरिया आणि व्हायरस यासारखे सूक्ष्मजिवाणू पूर्णपणे मारतो. १०० ते २८० नॅनोमीटर, मुख्यता २५४ नोमीटरचे अल्ट्रा वायोलेट किरण हे बॅक्टेरिया आणि व्हायरस यासारखे सूक्ष्मजिवाणू पूर्णपणे मारण्यास अत्यंत उपयुक्त शस्त्र आहे. हा बॉक्स आॅर्डिनोया तंञज्ञानाचा उपयोग करुण तयार करण्यात आला आहे. यासाठी आॅर्डिनो सॉफ्टवेअर मध्ये प्लॅटफॉर्मचा उपयोग करुन प्रोग्रामिंग करण्यात आलेली आहे. आॅर्डिनो मायक्रो कंट्रोलर हा पूर्ण सॅनिटायझर बॉक्सची सॅनिटायझ करण्याची पूर्ण वेळ आणि प्रक्रिया निर्धारीत करतो. वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोना योद्धा यांणि वापरलेले पोषाख आणि साहित्य यांना पूर्णपणे निर्जतूक करतो.यांनी केली बॉक्सची निर्मितीया बॉक्सचे डिझाईन आणि निमीर्ती रायसोनी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, ईलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्यूनिकेशन अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमूख प्रा. हरिष भंगाळे व प्रा. मनोज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश सोनवणे, शुभांगी मोरे, ज्योत्स्ना माळी आणि हर्षा वालदे या विद्यार्थ्यांनी ६२० रुपयात निमीर्ती केली आहे. सदर उपक्रमाचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ.प्रिती अग्रवाल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी कौतूक केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव