शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

यावर्षी कापसाचे उत्पादन जेमतेमच

By ram.jadhav | Updated: November 8, 2017 19:55 IST

आता दिवाळीनंतर काहीसा उजळून निघत आहे. ३५०० वर बंद होत असलेला खरेदीचा दर आता ३८०० ते ४४०० पर्यंत आले आहेत.

ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्रात एकरी २ क्विंटलचीच शक्यताएकाच वेचणीत झाडे खुर्राटबागायत कापसाच्याही वेचण्या आटोक्यातआँनलाइन, आँफलाइन खरेदीचे सोयरंसुतक नाहीच

संजय हिरेआॅनलाईन लोकमत, दि़ ८, खेडगाव, ता.चाळीसगाव : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने नुकसान केलेल्या कापसाला कमी भाव देऊन व्यापाºयांकडून शेतकºयांची अडवणूक केली जात होती़ मात्र हा कापूस आता दिवाळीनंतर काहीसा उजळून निघत आहे. ३५०० वर बंद होत असलेला खरेदीचा दर आता ३८०० ते ४४०० पर्यंत आले आहेत. याशिवाय दिवाळी आटोपल्याने शेतकºयांनाही कापूस विकण्याची आता घाई नाही़ यामुळेही आता दरात सुधारणा होत आहे. संपूर्ण कापसाची वेचणी आटोपूनच कापूस विक्रीला काढण्याच्या मन:स्थितीत आता शेतकरीवर्ग आला आहे. शिवाय यावर्षी उत्पादनही जेमतेमच असल्याने आपल्या कष्टाच्या उत्पादनाला असा अल्प भाव मिळत असल्याने यातून एकप्रकारे शेतकºयांनी अघोषित विक्री बंद पुकारल्याची स्थिती निर्माण होत आहे़यावर्षी कपाशीची आहे ती बोंडे एकाचवेळी फुटलीत. त्यामुळे एकाच वेचणीत झाड ‘खुर्राट’ होत आहे. साधारणत: यामागील हंगामात चार-पाच वेचण्या एका क्षेत्रात होत होत्या़ आता तशी स्थिती नाही. एका एकरात पहिल्या वेचणीत पाच क्विंटल कापूस निघाला असेल, तर दुसरी वेचणी जेमतेम निघत आहे़ अशी परिस्थिती प्रथमच पाहावयास मिळत असल्याची भावना शेतकरी मांडत आहेत़ हलक्या, मुरमाड जमिनीवर एक ते दोन क्विंटल उत्पादन निघणेही यावर्षी कठीण आहे़ एकरी १० क्विंटल उत्पन्न काढणारा भाग्यवान ठरणार आहे. तर सरासरी एकरी पाच क्विंटलचा उतारा बसल्याचे चित्र आहे.यंदा कापसात कवडीचे प्रमाण जास्त आहे. पावसाआधी, पावसातला आणि पावसानंतरचा अशी तीन टप्प्यात कापसाची प्रत झाली आहे. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचा एकसारखा कापूस दुर्मीळच आहे़ तसेच पावसातल्या कापसाची आर्द्रतेने चमक कमी झाली आहे़ तर आताच्या कापसात कचºयाचे प्रमाण वाढत आहे़शासकीय कापूस खरेदी केंद्र अजून ‘सुरू’च होत आहेत. आतापर्यंत फेडरेशनला एक कवडीदेखील कापूस न देणारे अनेक शेतकरी आहेत. खासगी कापूस विक्रीत अधिक भाव मिळत असल्याने व शासकीय कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर, हमाल यांच्याकडून होणारी अडवणूक, पैसे मिळण्यास होणारा विलंब यामुळे पूर्वीची टोकन काढून (आॅफलाइन) होणारी शासकीय खरेदी असो, की सध्य:स्थितीतील आॅनलाइन कापूस खरेदी शेतकºयांच्या ध्यानीमनी न आॅफलाइन, न आॅनलाइन आहे. फक्त एक सुरक्षा किंवा हमी या भावनेनेच शेतकरी फेडरेशन किंवा शासकीय खरेदी याकडे पाहतो. खासगी कापूस खरेदी ३८०० ते ४५०० रु.दराने सुरू झाली आहे. व शासकीय खरेदी भाव, ए' वन ग्रेडच्या कापसाला ४२५० व इतर मालास त्याहून कमी दर मिळणार आहे. घरबसल्या अधिक भाव, शिवाय प्रतवारीची, वाहतुकीची, आॅनलाइन नोंदणीची झंझट नको, या कारणास्तव शेतकºयांना शासनाने सुरू केलेल्या आॅनलाइन खरेदीची कोणतीच भुरळ आज तरी नाही.‘कवडी’ कापूस कवडीमोलच : परतीच्या पावसामुळे कपाशीच्या उमलणाºया बोंडाचे नुकसान झाले़ कवडी (लेंडी) व ओला कापूस सुकवण्याऐवजी विक्रीकडे शेतकºयांचा कल होता, शिवाय दिवाळीच्या सणासाठी पैशांचीही नड असल्याने बाजारात कापसाची विक्री होत होती़ हे हेरून व्यापाºयांनी २२०० ते २५०० हजारांइतका कवडीमोल भाव दिला. यावर्षी उत्पादन कमी असूनही कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजी आहे़ ज्या शेतकºयांना अडचण होती, त्यांनी गरजेच्या काळात न परवडणाºया दरातही विक्री केली़ मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकºयांनी कापसाची विक्री बंद केल्याने आता स्थिती सुधारली आहे.कर्जमाफीची प्रतीक्षाच़़़गेल्या सहा महिन्यांपासून वाट पाहत असलेल्या शेतकºयांनी खरिपाच्या पिकांवर खर्च केला. उत्पादनही घेतले, मात्र कर्जमाफी अजूनही मिळत नसल्याने शेतकºयांना नड म्हणून अल्प दरात आपले उत्पादन विकावे लागले़ कर्जमाफीची रक्कम उपलब्ध झाली असती तर शेतकºयांनी आपला माल कमी भावात विकला नसता़शासकीय कापूस खरेदीत ग्रेडरची, हमालांची मनमानी, त्यासाठी द्यावी लागणारी चिरीमिरी, प्रतवारीसाठीची अडवणूक, कमी भाव या सगळ्यांना कंटाळून मागील पाच-सहा वर्षांपासून फेडरेशनचा नाद सोडला आहे़ शिवाय बोनस देणेही सरकार विसरलंय. आणि दाराशीच खासगी व्यापाºयांकडून जास्तीचा दर मिळत असल्याने कोण जाणार आहे, फेडरेशनला़- मन्साराम महाजन, खेडगाव (शेतकरी)