जितेंद्र कंडारे याच्या मालमत्तेच्या जप्तीची प्रक्रिया होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:18 AM2021-02-24T04:18:26+5:302021-02-24T04:18:26+5:30

जितेंद्र कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता असल्याने न्यायालयाने तो फरार असल्याचे जाहीर केले आहे. तशी नोटीस त्याच्या घरावर ...

The process of confiscation of Jitendra Kandare's property will begin | जितेंद्र कंडारे याच्या मालमत्तेच्या जप्तीची प्रक्रिया होणार सुरु

जितेंद्र कंडारे याच्या मालमत्तेच्या जप्तीची प्रक्रिया होणार सुरु

Next

जितेंद्र कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता असल्याने न्यायालयाने तो फरार असल्याचे जाहीर केले आहे. तशी नोटीस त्याच्या घरावर लावली आहे. एक महिन्यांचा कालावधी पूर्ण होताच त्याची मालमत्ता जप्तीचे प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके

यांनी सांगितले.

ही आहे तपासी यंत्रणा

उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले, सहायक तपासाधिकारी संदीप भोसले, सहायक निरीक्षक सतीश वाळके, हनुमंत ननावरे, आसाराम शेटे, अमलदार वैजनाथ शिंदे, माधव करंदीकर, महेंद्र बाविस्कर, रुऊफ इनामदार, रमाकांत कांबळे, मनोहर सोनवणे, निलिमा गोसावी, सपना म्याना, सोनाली गायकवाड, नूतन जवेरी यांच्या पथकाने हा तपास केला आहे.

कोणावर काय दोषारोप

महावीर जैन

जैन हा शासनाच्या लेखा परिक्षण नियुक्तीबाबतचे पॅनलमध्ये नसताना व अवसायक जितेंद्र कंडारे याने नियुक्ती केली. लेखा परिक्षक म्हणून जैन याने वस्तूस्थिती दर्शविणारा अहवाल देणे अपेक्षित असताना कंडारे याच्याकाळातील अपहार उघड होऊ नये म्हणून खोटी कागदपत्रे तयार करुन दिशाभुल

करणारे मत नोंदविले. कंडारे याला जाणीवपूर्वक मदत करण्याच्या हेतूने अनेक बाबी लपवून ठेवल्या.

सुजित वाणी

पतसंस्थेतील सर्व संगणक याच्या ताब्यात होते. लिलावाच्या मालमत्तेची मुल्याकंन वारंवार स्वत:च्या सोयीने जितेंद्र कंडारे बदलून घेत होते. त्या संदर्भातील कागदपत्रे वाणी यांच्याकडे तयार होत होती. पतसंस्थेतील गैरव्यवहार लपविण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे

भासवले.

विवेक ठाकरे

ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचे काम केले. ठाकरे हा स्वत: अडीच कोटींचा कर्जदार आहे. त्याने हे कर्ज फेडले नाही. ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण तयार करुन जे मिळते ते घ्या असे लोकांना सांगून त्याने कंडारे, झंवर व इतर आरोपींबरोबर संगनमत करुन कमी किंमतीत लोकांच्या ठेव पावत्या घेऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेऊन एजंट म्हणून काम केले.

धरम सांखला

पतसंस्थेचा लेखापरिक्षक म्हणून काम करीत असल्याने त्याला ठेवीदार व कर्जदार व इतर सर्व व्यवहाराची माहिती होती. त्याने कंडारे गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली. लेखा परिक्षक असतानाही पतसंस्थेतून स्वत: व कुटुंबाच्या नावे अंदाजे साडेचार कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

कमलाकर कोळी

अवसायक जितेंद्र कंडारे याच्या गाडीवर कोळी हा चालक होता. गुन्हा दाखल होताना हाच कंडारे याच्यासोबत अहमदनगर येथे मुक्कामी होता. कंडारे फरार होताना कोळी हा शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होता.

Web Title: The process of confiscation of Jitendra Kandare's property will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.