शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शाहू नगर भागात समस्याच समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:08 IST

शाहुनगर परिसरामध्ये गटारींची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे, पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

शाहुनगर परिसरामध्ये गटारींची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे, पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवासी म्हणून सर्वांनाच पडला आहे.या परिसरात साडंपाण्याचा निचरा होण्यासाठी , प्रत्येक गल्ली-बोळीत गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र, या गटारींची वेळवर साफसफाई होत नसल्यामुळे, गटारींमध्ये घाण साचून पाणी तुंबत आहे. परिणामी हे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. तसेच ज्या दिवशी पाणी पुरवठा होतो. त्या दिवशी तर दिवसभर गटारीतींल पाणी रस्त्यावरुन वाहत असते . तसेच कचरा गाडीदेखील दोन दिवसाआड येत असल्यामुळे, अधिकच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या संदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार देखील केली आहे. मात्र, कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे, रहिवाशांना त्यांच्या घरासमोरील गटार स्वत:च साफ करावी लागत आहे. तसेच येथील रहिवासी हाजी सत्तार, चिराक उद्धीन शेख, शकिल शेख, सुकराबी बेलदार व इतर रहिवाशांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रारही केली होती. मात्र, तक्रार करुनही ही समस्या सुटलेली नाही. आठवड्यातून एखाद्या वेळेस सफाई कर्मचारी आले तर ते परिसरातील सर्व गटारींची सफाई न करता, रस्त्यावरच्या गटारींची सफाई करुन निघून जातात. त्या गल्ली-बोळीतील गटारींची सफाई करण्यासाठी सांगितल्यावर, ते गटारींवर अतिक्रमण असल्याचे सांगून, साफसफाईसाठी टाळाटाळ करतात. मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे.- रईस बाबा बागवान, शाहूनगर

टॅग्स :Jalgaonजळगाव