शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

जळगाव व भुसावळ तालुक्यातील वनजमिन बोगस विक्री प्रकरणी तक्रारदार पुढे येत नसल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:26 PM

अनेक राजकीय व्यक्ती अडकणार

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनाकडून उताऱ्यांची तपासणी सुरू साखळी असण्याची शक्यता

जळगाव: जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील वनविभागाच्या जमिनीची महसूलचे बोगस सातबारा बनवून विक्री करणाºया रॅकेटमध्ये शहर व तालुक्यातील सुमारे ५०-५५ व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून त्यातील बहुतांश राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याचे समजते. काहींनी तर मनपातही पदे भूषविली असल्याची चर्चा आहे. दरम्यान १०० कोटींहून अधिक असलेल्या या घोटाळ्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आता जिल्हाधिकाºयांनी नेमलेल्या चौकशी समितीने तपासाला गती दिली आहे. २०१० मधील संबंधीत गटांचा उतारा व आताचा उतारा यांची पडताळणी केली जात आहे.साखळी असण्याची शक्यतामहसूल विभागाचे बनावट शिक्के, तसेच कागदपत्र तयार करून वनविभागाच्या जमिनींचेच गट क्रमांक वापरून महसूलचे बनावट सातबारा तयार करण्यात आले असून त्याआधारे वनविभागाच्या जमिनीची विक्री करण्यात आली आहे. हे काम एकट्या-दुकट्याचे नाही हे आता चौकशी समितीला दिसून येत आहे. यात मोठी साखळी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.तक्रारदार पुढे येत नसल्याने अडचणया जमिनींची खरेदी करणाºयांना आपण केलेली जमिन वनविभागाची आहे, याचीच माहिती नसावी. त्यातच खरेदी व्यवहारानंतर नाव लागेले की नाही? यासाठी त्यांनी सातबार संबंधीत तलाठ्याकडे जाऊन मागितला तरीही तलाठीच या उद्योगात सहभागी असल्याने बनावट सातबारा दिला गेला असण्याची शक्यता आहे. रेकॉर्डमध्ये मात्र खरेदी-विक्री व्यवहाराच्या फेरफार नोंदी झालेल्या नाहीत. वरच्यावर हे व्यवहार करून फसवणूक करण्यात आली असून त्यातून १०० कोटींपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल झाली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र फसवणूक झाल्याची तक्रार अद्याप समोर आलेली नाही. तक्रारदार पुढे आल्यास याप्रकरणातील खरे सुत्रधार समोर येऊ शकतील.