शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा शिवारात हातभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:34 IST

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा शिवारातील हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख २७ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व कच्चे रसायन नष्ट केले.

ठळक मुद्देडीवायएसपी गजानन राठोड यांच्यासह पथकाची कारवाईसव्वा लाखांचा मुद्देमाल नष्ट

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कन्हाळा शिवारातील हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख २७ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व कच्चे रसायन नष्ट केले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यतील कन्हाळा शिवारात गावठी हातभट्टी सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे डीवायएसपी गजानन राठोड, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पो.कॉ.अजय माळी, प्रवीण पाटील, डीवायएसपी यांच्या पथकाने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता आरोपी युनुस हसन गवळी (रा.कन्हाळा) हे करीत असलेल्या बटाईच्या शेताजवळील बंधाऱ्यात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला. घटनास्थळावरुन एक लाख २५ हजार रुपयांचे पाच हजार लीटर कच्चे रसायन, दोन हजार ५०० रुपयांचे २०० लीटरचा एक ड्रम उकळते रसायन असे एकूण एक लाख २७ हजार ५०० रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले.याबाबत तालुका पोलिसात पो.कॉ.संकेत झांबरे यांच्या फिर्यादीवरुन युनुस हसन गवळी यांच्याविरुद्ध गुरनं. १७४/१८, मुंबई पोलीस कायदा कलम ६५ फ.ब.क. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला. तपास पीएसआय दिलीप पाटील करित आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीBhusawalभुसावळ