भुसावळ : -तालुक्यातील कुºहे पानाचे व किन्ही शिवारामध्ये देशी दारूच्या बाटल्या हस्त करीत हातभट्टीवर तालुका पोलिसांनी छापा मारत ६० हजाराचा मुद्देमाल नष्ट केला.पहिल्या घटनेमध्ये कुºहे पानाचे या गावी अनिल राजाराम पारधी यांच्या ताब्यातील ३६ देशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी छापा मारून हस्तगत केल्या तर दुसऱ्या घटनेमध्ये किन्ही शिवारातील नाल्याजवळ रशीद रन्नू गवळी हा गावठी हातभट्टीची दारू तयार करताना ९ ड्रममध्ये ८०० लिटर नवसागर, महु मिश्रित कच्चे रसायन एकूण ६० हजाराचे नष्ट केले.सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदशनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पो. हे. कॉ. विठ्ठल फुसे, रियाज काझी , शिवाजी खंडारे यांनी केली.
कुºहे पानाचे येथे दारुच्या भट्टीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 22:09 IST