शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ‘डब्बा ट्रेड’ मार्केटींग सेंटरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:13 IST

जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

जळगाव : शेअर मार्केटींगमधील ‘डब्बा ट्रेड’ नावाचा अवैध मार्केटींग व्यवसाय करणाऱ्या शहरातील जयकिसनवाडी व गणेश कॉलनी येथील सेंटरवर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता छापा मारला. त्यात मुख्य संशयित चेतन छाजेड याच्यासह तीन जणांना तर गणेश कॉलनीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.जयकिसनवाडीतील एका दुमजली इमारतीतीत शेअर मार्केटमधील ‘डब्बा ट्रेड’ नावाचा अवैध व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार रोहन यांनी त्यांच्या कार्यालयातील उपनिरीक्षक मनोहर जाधव, सुनील पाटील, किरण धमके, राजेश चौधरी, अशोक फुसे, नाना मोरे, सचिन साळुंखे व महेश पवार यांच्यासह मंगळवारी सायंकाळी इमारतीतील कार्यालयावर छापा टाकला.तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर डॉ. रोहन यांनी चेतन छाजेड याच्यासह दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील संगणक, मोबाईल व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.जयकिसनवाडीतील घटनेप्रकरणी शहर पोलिसात तर गणेश कॉलनीतील घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या व्यवसायाबाबत दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ होते, हे विशेष !मोबाईलद्वारे चालतो व्यवहार‘डब्बा ट्रेड’ हा व्यवसाय सट्टा व हवालाच्या व्यवसायाशी मिळता जुळता आहे. मोबाईलवर ग्राहकांकडून पैशाची बोली लावली जाते. आॅनलाईन मार्केटनुसार पैसा मिळतो. फक्त काळा पैसाच यात खेळला जातो. केवायसीद्वारे लॉग इन करुन बॅँकेच्या माध्यमातून पैसा वळता केला जातो. हा पैसा अधिकृत मानला जातो. डब्बा ट्रेडमध्ये मोबाईलवरच संपर्क करुन पैशाचा व्यवहार केला जातो. छाजेड याच्या कार्यालयातून पुणे व मुंबई येथे पैसा लावला जात असल्याचे उघड झाले. डब्बा ट्रेड हा व्यवसाय अवैधरित्याच चालत असल्याची माहिती डॉ.नीलाभ रोहन यांनी दिली.कार्यालय ब्रोकरचे, काम डब्बा ट्रेडचे...चेतन छाजेड याची ओळख ब्रोकर म्हणून आहे. त्याच्या कार्यालयात खरेदी-विक्रीसंबंधीच कामकाज चालत असल्याचा समज होता. मात्र या कार्यालयात ब्रोकरच्या नावाखाली डब्बा ट्रेड नावाची अवैध व्यवसाय चालत असल्याचे प्रथमच उघड झाले. कार्यालय आलिशान असल्याने कोणालाही संशय येत नाही. दरम्यान, गेल्या वर्षी छाजेड याच्यावर याच कार्यालयात हल्ला झाला होता. कार्यालयाचीही तोडफोड झाली होती. त्यामागे हेच कारण असावे अशी चर्चा घटनास्थळावर होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव