शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या प्रिन्सला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार; घरात शिरलेल्या चोरट्याशी दिली होती झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 13:09 IST

पुढील महिन्यात पुरस्काराचे वितरण होणार

- संजय पाटील

जळगाव: प्रिन्स नितीन पाटील (रा. अमळनेर, ह. मु. चोपडा) या बालकाला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यपाल कार्यालयातून पाटील कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली. प्रिन्स उर्फ  प्रणित नितीन पाटील हा पंकज ग्लोबल शाळेचा विद्यार्थी असून घरात शिरलेल्या चोरट्याशी झुंज दिल्याबद्दल त्याला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  

राज्य बाल आयोग कार्यालयातून ही माहिती देण्यात आल्याचे पालक नितीन पाटील यांनी सांगितले. पुढील महिन्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. गेल्या वर्षी नितीन रामभाऊ पाटील यांच्या चोपडा येथील ओम साई अपार्टमेंटमध्ये ते घरी  नसताना दुपारी ३ च्या सुमारास एक अनोळखी महिला आणि एक पुरुषाने लूटमार करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. मिरचीचा स्प्रे प्रणितची आई वैशाली हिच्या तोंडावर मारला. वैशाली पाटील यांनी चोराची कॉलर पकडून विरोध करत असताना चोरट्याने त्यांना मारहाण करत ढकलून दिले. अवघ्या १२ वर्षाच्या प्रणितने  चोरट्याचा पाय घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे त्याला पळता येत नव्हते. बराच वेळ प्रणितने ताकद लावून त्याला घट्ट धरून ठेवले. त्या दरम्यान घरातील काम करणाऱ्या लताबाईने गॅलरीत जाऊन आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. आजूबाजूच्या लोकांनी खाली गर्दी केली. त्याचवेळी चोर  प्रणितच्या तावडीतून पळाला. तोपर्यंत खाली जमलेल्या गर्दीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वैशाली पाटील यांचे प्राण वाचले आणि दरोडा पडण्यापासून बचावला. प्रणितच्या या धाडसाचे कौतुक झाले आणि तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी बाल शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे सुचवले. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मंगळवारी  राज्य बाल आयोग कार्यालयातून अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी फोनवरून प्रणित उर्फ प्रिन्सला  राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.  प्रणितचे वडील नितीन रामभाऊ पाटील हे अभियंता व संस्थाचालक आहेत. आई वैशाली गॅस एजन्सीचा कारभार पाहतात.