शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजने’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, खासदार रक्षा खडसे यांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:01 IST

आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

ठळक मुद्दे10 ते 15 हजार अर्ज भरलेएजंटांमार्फत सर्वसामान्यांची लूट

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27-  बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमांतर्गत ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजना’ राबविली जात असून त्यात मुलीच्या विवाहप्रसंगी दोन लाख रुपये दिले जाणार असल्याचे सांगून जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात अर्ज भरले जात आहे. यामाध्यमातून नागरिकांची फसवणूक सुरू असून अशी कोणतीच योजना नसल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. यास जनतेने बळी न पडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या संदर्भात रक्षा खडसे यांनी पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. या वेळी त्या म्हणाल्या की, ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजना’ असल्याची अफवा पसरवून त्याचे छापील अजर्ही तयार करण्यात आले आहे. हे अर्ज ङोरॉक्सच्या दुकानावरून बिनबोभाटपणे विक्री होत असून सामान्य नागरिक त्यास बळी पडत आहे. 

एजंटांमार्फत सर्वसामान्यांची लूटङोरॉक्सच्या दुकानावर दोन रुपयांना एक अर्ज विक्री होत असून हे अर्ज भरणे व ते पाठविण्यासाठी बहुतांश ठिकाणी एजंटांमार्फत 200 ते 500 रुपये उकळले जात आहे. या शिवाय बरेच नागरिक स्वत: अर्ज भरुन भारत सरकार, महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाच्या पत्त्यावर टपालाने पाठवित आहे. 

10 ते 15 हजार अर्ज भरलेरावेर, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यात हा प्रकार जास्त असून जिल्ह्यातही तो सुरू असण्याची शक्यता खासदार खडसे यांनी वर्तविली. यामध्ये 10 ते 15 हजार अर्ज भरले गेले असून एका अर्जासाठी 32 ते 35 रुपये खर्च येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या शिवाय एजंट वेगळी रक्कम घेतात. त्यामुळे नागरिकांची फसगत करून केवळ लूट केली जात असल्याचे खडसे यांचे म्हणणे आहे. 

सरपंचांची सही आवश्यक6 ते 32 वयोगटातील मुलींसाठी ही योजना असून हा अर्ज भरल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी दोन लाख रुपये मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. या अर्जावर मुलीचे छायाचित्र लावण्यासह कुटुंबाची माहिती, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड अशी सविस्तर माहिती असलेले बनावट अर्ज तयार करण्यात आल्याचे खासदार खडसे म्हणाल्या. विशेष म्हणजे यावर गावातील सरपंचांची सहीदेखील आवश्यक असून सरपंचांद्वारेही गावातील मुलींचे काम असल्याने सह्या दिल्या जात असल्याचे चित्र आहे. 

बळी पडू नकाकेंद्राची अशी कोणतीही योजना नसून नागरिकांनी यास बळी पडू नये, असे सांगत खासदार खडसे यांनी बाबत अधिका:यांकडूनही माहिती घेतली. मात्र योजनाच नसल्याचेसांगण्यातआले.