शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात जाण्यापूर्वीच पुजाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:19 IST

तुळजाई नगरातील घटना : बोअरवेल सुरू करताना घडली घटना... जळगाव :  साई गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर बोअरवेल सुरू ...

तुळजाई नगरातील घटना : बोअरवेल सुरू करताना घडली घटना...

जळगाव :  साई गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर बोअरवेल सुरू करताना विजेचा धक्का लागून अनुपम मोहन प्रसाद (२५, रा. योगेश्वर नगर, मूळ रा. सटना, मध्य प्रदेश) या तरुण पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता जुने जळगाव रोड परिसरातील तुळजाई नगरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनुपम प्रसाद हे तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात पुजारी असून शेजारच्याच योगेश्वर नगरात ते वास्तव्याला होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पावणे सात वाजता पूजा व आरती करण्यासाठी तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात आले. या ठिकाणी त्यांनी बाहेरील स्वच्छता केली. नंतर मंदिराच्या आवारात झाडावर लटकविलेल्या डीपीवर बोअरवेलचे बटण दाबण्यासाठी गेले असता त्यांना जोरदार धक्का लागला.यात ते खाली कोसळले व जागीच त्याचा मृत्यू झाला. रोज सकाळी ७ वाजता आरती होत असल्याने मंदिराच्या शेजारी रहात असलेल्या विमल कुदळ या मंदिरात आल्या असता त्यांना पुजारी प्रसाद पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लाकडी फळी तसेच झाडूच्या साहाय्याने वीजप्रवाह खंडित करून प्रसाद यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रघुनाथ महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली तसेच पंचनामा केला. पुजारी प्रसाद हे मूळ मध्य प्रदेशातील सटना येथील रहिवासी आहेत. सात वर्षांपासून तुळजाई नगर येथील साईगणेश या मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत आहेत. योगेश्‍वर नगरात भाडे करारावर खोलीत वास्तव्यास आहेत. आई-वडील गावाकडे असल्याने एकटेच राहत होते.पावसामुळे उतरला वीजप्रवाहशनिवारी रात्री पाऊस झाल्याने त्यात काहीतरी बिघाड होऊन डीपीत वीजप्रवाह उतरला होता. सकाळी नेहमीप्रमाणे पुजारी आपल्या कामाला लागले आणि त्यात ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, तुळजाई नगरात महापालिकेचे श्री संत संताजी जगनाडे महाराज नावाचे उद्यान आहे. याच उद्यानात २०१२ मध्ये साईगणेश मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराचे बांधकाम झाले तेव्हापासून अनुपम प्रसाद हेच पुजारी म्हणून काम पाहत होते. शनिवारी १२ डिसेंबर रोजी या मंदिराचा वर्धापनदिन होता. पुजारी प्रसाद यांच्या हस्ते पूजाविधी होऊन प्रसादाचे वाटप झाले होते. रविवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, प्रकाराबाबत महापालिकेला कळविण्यात येऊन डीपीवरील पुरवठा खंडित करण्याबाबत सांगण्यात आले; मात्र ७ तास उलटूनही वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव