भुसावळ, जि.जळगाव : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना यांच्यातर्फे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी दीपनगर येथील उपमुख्य अभियंता एन.आर.देशमुख होते.प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक डॉ.यशपाल भिंगे (नांदेड) होते. डॉ.भिंगे यांनी आपल्या दीड तासाच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात धनगर जमातीच्या २००० वर्षांचा ऐतिहासिक राज्यसत्तेचा इतिहास प्रभावीपणे मांडला. १९८९ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी धनगरांना एनटी-सीचे ३.५ टक्केचे घटनाबाह्य महाराष्ट्रापुरते तुटपुंजे आरक्षण देऊन देवाच्या आळंदीऐवजी चोराच्या आळंदीच्या एस.टी.त बसवल्याचा घणाघाती आरोप केला. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.प्रास्ताविक चंद्रशेखर सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन अनुक्रमे डॉ.पद्माकर सावळे, प्रीतम भागवत यांनी केले. योगेश गांधेले यांनी आभार मानले. या वेळी भुसावळ शहरासह तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.
भुसावळ येथे धनगर समाजातर्फे गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:07 IST
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना यांच्यातर्फे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
भुसावळ येथे धनगर समाजातर्फे गुणगौरव
ठळक मुद्देप्रमुख वक्त्यांनी मांडला दोन वर्षांचा इतिहासकठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही