शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने गव्हाच्या भावात १०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:34 IST

जळगाव जिल्हा, शिरपूर, नंदुरबारसह मध्यप्रदेश, गुजरात येथून गव्हाची प्रचंड आवक

ठळक मुद्देभावात अजून घसरण होण्याची शक्यताग्राहकी वाढेना

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - बाजारपेठेत गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पाहिजे तशी ग्राहकी नसल्याने गव्हाच्या भावात दोनच दिवसात १०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली आहे. ग्राहकांची खरेदीबाबतची मानसिकता बदलत असल्याने हा परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.धान्य खरेदीच्या हंगामात यंदा मार्च महिना अर्ध्याहून अधिक उलटला तरी बाजारपेठेत पाहिजे तशी ग्राहकी नसल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. त्यात सध्या गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. जळगाव जिल्हा, शिरपूर, नंदुरबारसह मध्यप्रदेश, गुजरात येथून गव्हाची प्रचंड आवक होत आहे.बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असली तरी पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक बाजाराकडे वळलेला नाही. मध्यंतरी झालेले ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस या मुळे गव्हाच्या दर्जावर परिणाम होण्याच्या भीतीने खरेदीच्या बाबतीत ग्राहक हात आखडता घेत आहे. त्यात सध्या मार्च अखेर असल्याने आर्थिक बाजूचाही विचार केला जात आहे. एप्रिलमध्ये उन्हाचे प्रमाण वाढून गव्हातील ओलावादेखील निघेल या विचाराने ग्राहक एप्रिल महिन्यात धान्य खरेदीच्या विचारात असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.त्यामुळे सध्या ग्राहकी अभावी गव्हाच्या भावात १०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली. दोन दिवसांपूर्वी २१२५ रुपये प्रति क्विंटल असलेले १४७ गव्हाचे भाव २०२५ रुपये प्रति क्विंटलवर खाली आहे. तसेच २००० ते २०१५ असलेले लोकवन गव्हाचे भाव १९०० ते १९२५ रुपये प्रति क्विंटलवर आले.आणखी भाव कमी होण्याची शक्यताअद्याप राजस्थानमधून येणा-या गव्हाची आवक सुरू झालेली नाही. ती आवक सुरू झाली की, गव्हाचे भाव आणखी ५० रुपये प्रति क्विंटलने कमी होण्याचा अंदाज व्यापा-यांनी वर्तविला आहे.सध्या बाजारात गव्हाची आवक वाढली असून ग्राहकी नसल्याने गव्हाच्या भावात १०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली आहे. यात आणखी ५० रुपये प्रति क्विंटलने घसरण होण्याची शक्यता आहे.- विजयकुमार वाणी, धान्य व्यापारी.

टॅग्स :JalgaonजळगावMarketबाजार