शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक बंदीचा परिणाम : खाद्य पदार्थांच्या वस्तूंचे भाव वधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:48 IST

विजयकुमार सैतवालजळगाव : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आल्याने खाद्य पदार्थांच्या आवरणासाठीही (पॅकेजिंग मटेरिअल) वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी आता वाढवावी लागणार असल्याने आवरणाचे भाव वाढून त्याचा थेट परिणाम खाद्य पदार्थांच्याही किंमतीवर होणार आहे. त्यामुळे या पदार्थांचे भाव ५ ते १० टक्क्याने वाढण्याचे संकेत व्यापारी वर्गातून दिले जात ...

ठळक मुद्देबाजारात ९० टक्के वस्तू प्लॅस्टिकमध्येजळगावात सहा उद्योग

विजयकुमार सैतवालजळगाव : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आल्याने खाद्य पदार्थांच्या आवरणासाठीही (पॅकेजिंग मटेरिअल) वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी आता वाढवावी लागणार असल्याने आवरणाचे भाव वाढून त्याचा थेट परिणाम खाद्य पदार्थांच्याही किंमतीवर होणार आहे. त्यामुळे या पदार्थांचे भाव ५ ते १० टक्क्याने वाढण्याचे संकेत व्यापारी वर्गातून दिले जात आहे.मार्च महिन्यात प्लॅस्टिक बंदीबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढल्यानंतर २३ जून पासून राज्यात बंदी लागू करण्यात आली. यामध्ये खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया आवरणाची जाडी ५० मायक्रॉनपेक्षा कमी नसावी, असे निर्देश आहे. त्यामुळे आता या आवरणाची जाडी वाढवावी लागणार आहे.जळगावात सहा उद्योगखाद्य पदार्थांचे आवरण (पॅकेजिंग मटेरिअल) तयार करणारे जळगावात सहा उद्योग आहेत. या ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचेही प्लॅस्टिक तयार केले जात होते. मात्र आता बंदीमुळे या ठिकाणी केवळ ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचेच प्लॅस्टिक तयार करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे साहजिकच निर्मिती खर्च वाढून आता त्याची किंमतही वाढणार आहे.बाजारात ९० टक्के वस्तू प्लॅस्टिकमध्येप्लॅस्टिकवर सरकारने बंदी घातली असली तरी बाजारपेठेचा विचार केला तर जवळपास ९० टक्के वस्तू प्लॅस्टिकची आवरणे असलेलीच आहे. यामध्ये बेकरीतील वस्तू, फास्ट फूड, पॉपकॉर्न, चहा पावडर असे घरातील बहुतांश वस्तू प्लॅस्टिकमध्येच असते. त्यामुळे बंदी घालताना आवरणासाठी वापरात येणाºया प्लॅस्टिकचे दर कमी होणे गरजेचे आहे. अन्यथा प्लॅस्टिक निर्मितीचा खर्च वाढून त्याचा थेट बोझा ग्राहकांवरच येण्याची चिन्हे आहे.खाद्य पदार्थ महागणारप्लॅस्टिकची जाडी वाढल्याने त्याचा वाढीव खर्च विक्रेतेही सहन करणार नाही व ते थेट खाद्य पदार्थांच्या किंमती वाढवतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पाच-दहा रुपयांना मिळणारे पॉपकॉर्नचे पाकीटही आता सात ते १४ रुपयांना मिळेल, असा अंदाज आतापासूनच वर्तविला जात आहे. अशाच प्रकारे बेकरीतील वस्तू, चहा पावडर, फास्ट फूड व इतरही वस्तूंचे दर वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया आवरणाची जाडीही आता वाढवावी लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत वाढून खाद्य पदार्थांचेही दर ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.-किरण राणे, कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशन

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJalgaonजळगाव