शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खान्देशात 3 ठिकाणी ‘विद्यार्थी सुविधा’ केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 07:57 IST

समाज घटकांच्या सशक्त सामाजिक व आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याचे ब्रीद घेतलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून खान्देशात तीन ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

चुडामण बोरसे/ जळगाव, दि.15 - समाज घटकांच्या सशक्त सामाजिक व आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याचे ब्रीद घेतलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून खान्देशात तीन ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत विद्यापीठाने नंदुरबार, अमळनेर आणि फैजपूर या तीनठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्रे सुरु झाली आहेत. एमकेसीएलच्या मदतीने ही केंद्रे कार्यान्वीत झाली आहेत. आता चाळीसगाव, शहादा आणि धुळे याठिकाणी ही सुविधा केंद्रे सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

विद्यार्थ्यांना अनेकवेळा गुणपत्रक, श्रेणीसुधार परीक्षा, पात्रता आदी विषयांसाठी विद्यापीठात यावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांंची गैरसोय होतेच शिवाय आर्थिक ताणही सहन करावा लागतो. ही सगळी धावपळ टळावी, यासाठी विद्यापीठाने हे विद्यार्थी हिताचे पाऊल उचलले आहे.

विद्यार्थी केंद्रात अशा असतील सुविधा- विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठीय प्रशाळांमधील विविध अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता, आवश्यक निर्धारित शुल्क ह्या बाबत माहिती मिळेल.- विविध प्रमाणपत्रांची मागणी, प्रमाणपत्र तपासणी, प्रमाणीकरण संदर्भातील अर्ज.- विद्यापीठाशी संबंधित सर्व प्रकारचे शुल्क आॅनलाईन अर्जासह स्वीकारण्याची सोय या सुविधा केंद्रात असेल.- परीक्षांविषयी अर्ज .- परीक्षा देण्यासंदर्भात संधी संपणे, संधीवाढ व त्या अनुषांगिक कामे.- विद्यापीठ संकेतस्थळावर निकाल न दिसणे, निकालानंतर पुनर्मुल्यांकन, निकाल राखीव असणे, फोटो कॉपी, व्हेरीफिकेशन आदी सुविधा या केंद्रात उपलब्ध होणार आहेत.

ही सुविधा केंद्रे एमकेसीएलच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रात एमकेसीएलचा प्रतिनिधी पूर्णवेळ उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे सुविधांचे केंद्र ठरणार आहे.

नंदुरबार, अमळनेर आणि फैजपूर येथे विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु झाली आहेत. आता यानंतरच्या टप्प्यात चाळीसगाव, शहादा आणि धुळे येथे ही सुविधा केंद्रे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. - पी.पी.पाटील कुलगुरु, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव