शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

मार्च अखेरची धावपळ, जळगावात ‘कोषागार’कडे ८१ कोटींची बिले सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 12:25 IST

रात्री उशिरापर्यत सुरू होते कामकाज

ठळक मुद्देडीपीडीसीचा ९७ टक्के निधी खर्च९८ टक्के महसूल वसुली

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - जिल्हा कोषागार कार्यालयात मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिवसभर विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या फेºया सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत बिले स्वीकारली गेली. या काळात जवळपास ८१ कोटी ३८ लाख ५६ हजार १०४ रुपयांची ९२८ बिले सादर झाल्याची माहिती या विभागाच्या सूत्रांनी दिली. यात ३१ मार्च रोजी एकाच दिवसात ३८९ बिले सादर झाली.शासनाकडून विविध योजनांवर अनुदानांची तरतूद केली जात असते. तर प्राप्त निधी खर्ची करण्यासाठी अनुदानांची बिले तयार करून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया ही संबंधित विभाग ते कोषागार कार्यालय यांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोषागार कार्यालयात विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयाच्या फे-या सुरू होत्या.फाईल्स घेऊन धावपळकोषागार कार्यालयात सकाळी १० वाजेपासून सर्वच कर्मचाºयांना हजर रहाण्याचे आदेश होते. या विभागातील संगणकांवर प्राप्त होणाºया अनुदानांवर लक्ष ठेवून संबंधित विभागांना त्याबाबत सूचना दिल्या जात होत्या. त्यानुसार प्राप्त झालेली बिले मंजूर केली जात होती.विभागांकडून अशी सादर झाली बिलेविविध योजनांवर होणारी तरतूद, आकस्मिक खर्च, प्रवासी भत्ता, वेतन देयके, वैयक्तिक प्रतीपूर्ती, वैयक्तिक लाभार्थी, अनुदाने, सहायक अनुदानांचे संध्याकाळपर्यंत ९२८ बिले दाखल झाली होती. शासन आदेशानुसार रात्रीपर्यंत बिले स्विकारली जात होती. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत ठाण मांडून होते. प्राप्त वृत्तानुसार संध्याकाळपर्यंत सुमारे ८१ कोटी ३८ लाख ५६ हजार १०४ रुपयांची विविध विभागांची बिले जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर झाल्याचे कोषागार अधिकारी पी.एस. पंडित यांनी सांगितले.धावपळ कमीपूर्वी सारखी मार्च अखेरची धावपळ सध्या नाही. अनुदान वाटपाची प्रक्रिया आता तिमाही झाल्याने त्या त्या काळात बिले सादर होऊ लागल्याने मार्च अखेरची गर्दी तसेच धावपळही कमी झाल्याचे चित्र आहे.डीपीडीसीचा ९७ टक्के निधी खर्चजिल्हा नियोजन विकास समितीचा (डीपीडीसी) ९७ टक्के निधी खर्च झाला आहे. डीपीडीसीला या वर्षात ४५४ कोटींचा निधी मिळालेला होता. त्यापैकी ३१ मार्च अखेर ४४८ कोटींचा निधी खर्च झाला. यामध्ये २८६.७६ कोटी डीपीडीसी, ७९ कोटी आदिवासी विभागाचा, ८९ कोटी समाज कल्याण विभागाचा खर्च झाला आहे.९८ टक्के महसूल वसुलीमहसूल विभागाने विविध महसुली वसुलीसाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांना लक्षांक ठरवून दिला होता. त्यानुसार ३१ मार्च रोजी सायंकाळपर्यंत आढावा घेणे सुरू होते. त्यानुसार महसुली वसुलीच्या १३२ कोटी १८ लाख लाखाच्या उद्दीष्टापैकी १३० कोटीची वसुली करीत जिल्ह्यास ठरवून दिलेल्या वसुलीच्या ९८.३७ टक्के वसुली झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी सांगितले.

टॅग्स :collectorतहसीलदारJalgaonजळगाव