शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथील तरुणी अत्याचारातून गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 20:25 IST

शौचास जात असताना जबरदस्तीने शेतात नेऊन चिनावल, ता.रावेर येथील एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी  यशवंत सुरेश इंगळे (रा.चिनावल, ता.रावेर) या तरुणाविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शून्य क्रमांकाने हा गुन्हा सावदा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल  उपचार करताना फुटली बोंबसहा महिन्यापूर्वी झाला होता अत्याचार

जळगाव : शौचास जात असताना जबरदस्तीने शेतात नेऊन चिनावल, ता.रावेर येथील एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी  यशवंत सुरेश इंगळे (रा.चिनावल, ता.रावेर) या तरुणाविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शून्य क्रमांकाने हा गुन्हा सावदा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  चिनावल येथील एका तरुणीच्या पोटात दुखायला लागल्याने तिला आईने रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे निदान केले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार समजताच आईला धक्का बसला. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सांगितले की, शौचास जात असताना  यशवंत सुरेश इंगळे याने जबरदस्तीने रस्ता अडवून शेतात नेऊन बलात्कार केला होता. या प्रकाराची माहिती कोणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे पीडितेने हा प्रकार कोणालाच सांगितला नव्हता.शनिवारी रात्री तीच्या पोटात दुखायला लागले. गावात तात्पुरत्या गोळ्या घेऊन रविवारी आईने तिला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता ती गर्भवती असल्याचे निदान झाले. जिल्हा पेठ पोलिसांनी पीडित व तिच्या आईचा जबाब घेऊन यशवंत इंगळे याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा सावदा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी