शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संत श्री गुलाम महाराज यांचा उपदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:08 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरातील लेख.

गुलाम महाराजांच्या आप मंडळाचा ध्वज लाल रंगाचा, चौकोनी आकाराचा रूमाल होता. लाल हा क्रांतीचा रंग होय. आप मंडळाची सामुदायिक आरती आत्मसन्मानाची प्रतीकच होती. श्री शंकराव देव यांनी या आरती कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला होता. काही पुढारी, वरिष्ठ वर्ग यांच्यासमवेत प्रतापपूरचे राणे चिप्टन यांनी आरती चळवळीला विरोध केला होता. गुलाम महाराजांचा उपदेश साधा, सोपा आणि सुटसुटीत आहे. सूत्रबद्ध आहे. त्यांना कधी व्याख्यान वा प्रवचन देण्याची आवश्यकता भासली नाही. महाराजांचे वैचारिक अधिष्ठान पुढील 10 सूत्रांमध्ये गुंफले आहे. 1) शौचास जाताना शुद्धीसाठी पाण्याचा उपयोग करा. 2) रोज न चुकता स्नान करा. 3) कपाळी गंध वा कुंकू लावा. 4) मद्यपान करू नका. 5) भांग आदी मादक द्रव्यापासून लांब रहा. 6) शाकाहाराचे पालन करा. 7) सत्यवादी बना. 8) लबाडीचा व्यवहार करू नका. 9) एकमेकांना फसवू नका. 10) ‘आप’ची म्हणजे परस्परांची आरती करा. या उपदेशावर जो गांधी प्रभाव आहे. सामाजिक समरसता, आर्थिक ऊध्र्वीकरण, आंतर्बाह्य शुचिता आणि आध्यात्मिक जागरणाची चतु:सूत्री यात अंतभरूत आहे. यात आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक सूत्रे ग्रथित आहेत. माघ शुद्ध एकादशीला गुलाम महाराजांनी आप मंडळाचा पहिला सामुदायिक आरती समारंभ संपन्न केला. हा समारंभ दर सोमवारी व्हायचा. हजारो स्त्री-पुरुष या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. उजळत्या मुखमंडलासोबत झळाळत्या दीपज्योतीने अवनी- अंबर थरारून जाई. अशा आठवणी सांगणारे आजही आहेत. महाराजांनी स्वत:ची मात्र कधीही आरती करवून घेतली नाही. आरतीच्या कार्यक्रमासाठी तेल वातीचीच काय ती गरज वाटायची. याशिवाय यासोबत नारळ, गंध, फु ले, अगरबत्ती, कापूर यासारखे कोणतेही पूजाद्रव्य असू नये यावर महाराजांचा कटाक्ष होता. मोरवड गावचे नाव बदलून त्यांनीच रंजनपूर असे केले. आरती समारंभ आटोपल्यावर जनलोक प्रचारार्थ आसपासच्या गावांना जात असत. विशेष निमंत्रणाशिवाय कुणाच्या गावी वा घरी जायचे नाही, असे ठरले होते. या सामंजस्यपूर्ण योजनेमुळे जवळपासचेच नव्हे तर लांबलांबून लोक आरतीसाठी रंजनपूरला येत असत. रंजनपूर आता प्रतिपंढरपूर बनले होते. त्या काळी लोक गात असत, ‘‘पाऊस पडला चिखल झाला, कशाला जाता इतक्या दूर, हेच आपले पंढरपूर.’’ रंजनपूरला यात्रा स्थानाचे महत्त्व आले. सोमवारी लोकांचा कडक उपवास असायचा. दिवे लागणीची वेळ ही आरतीची वेळ असायची. हजारो दांपत्यांनी केलेली सामुदायिक आरती विशिष्ट असायची. जनताजनार्दनाच्या या मंगलमय आरतीनंतर प}ींनी आपापल्या पतीची आरती करायची पद्धत होती. हा सामुदायिक सोहळा कमालीच्या गंभीरपणे पार पडायचा. गुलाम महाराजांसंबंधी श्रद्धा व्यक्त करणारे भिलोरी भाषेतील हे एक पद बघा.. गुला भगवान गुला भगवान । भेट देजे देव अमुने । एकि हाकिडी, वाकडी वेल्योपे । बोलि देजे देव अमुने ।। रात दीही तो जे भगवान । नाव लिऊँ आमु पोयरे । जिहीं जाऊँ तिही भगवान । तोजे नाव लिऊँ आमून ।। चला आपू होगे मिलिगे । देवाला मिला जाते रा । उबे वाटे तो जे भगवान । भजन केयते आउरा ।। गुला भगवान.. थोडक्यात, या पदाचा अर्थ असा सांगता येईल की, हे गुला भगवान, तू आम्हाला भेट दे. आम्ही तुझी लेकरे तुङो रात्रंदिवस नामस्मरण करत आहोत. आम्ही जिथे कुठे म्हणून जाऊ तिथे तुङोच नामस्मरण करू, कारण की तूच आमचा भगवान आहेस. चला आपण सारे मिळून देवाच्या भेटीसाठी जाऊ या. मार्गात देवाचे भजन करू या. गुलाम महाराजांनी गांधी चळवळीशी नाते सांगत सातपुडय़ाच्या द:याखो:यांमधून क्रांतिनाद घुमवला. त्याच्या काही खुणा आजही परिसरात वाचता येतात. महाराजांनी खानदेशच्या भूमीवर भक्तीचे एक मनोरम स्वप्न फुलवले. आत्मप्रत्यय आणि आत्मसन्मान वाढवण्याकामी महाराजांनी केलेल्या या आध्यात्मिक प्रय}ांची नोंद जागरणाच्या वाटेचा अभ्यास करणा:यांना महत्त्वाची ठरावी. 19 जुलै 1938 रोजी महाराजांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला.