शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

पूर्वकर्म होळी सांडू.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:39 IST

वारकरी सांप्रदायातील संताच्या अभंगात होळी या सणाचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. संत तुकाराम महाराज सांगतात. दैंय दु:ख आम्हा न येती ...

वारकरी सांप्रदायातील संताच्या अभंगात होळी या सणाचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. संत तुकाराम महाराज सांगतात.दैंय दु:ख आम्हा न येती जवळी । दहन हे होळी होती दोष।।तुकोबा सांगतात - ‘मी होळीत माझ्यातले दोष जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की, दारिद्र आणि दु:ख माझ्या जवळ सुद्धा येत नाही. दोष नाही तर दारिद्र नाही, आणि त्यामुळे दारिद्रांतून निर्माण होणारे दु:ख नाही.’वंदू चरणरज सेवू उष्टावळी । पूर्वकर्म होळी सांडू ।।अमुप हे गाठी बांधू भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ।।तुकोबा या अभंगात सांगतात- आम्ही पांडुरंगाची चरणवंदना करून, त्यांचे उष्टे सेवन करू, त्यामुळे माझ्या पूर्व कर्माची होळी होईल.शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज सांगतात-देह चतुट्याची रचोनि होळी । ज्ञानाग्नी घालुनी समुळ जाळी ।।१।।अजुनि का उगलासी। बोंब पडो दे नामाची ।।२।।मांदियाळी मिळवा संतांची । तुम्हा साची सोडविण्या ।।३।।धावण्या धावती संत अंतरंग । संसार शिमगा सांग निरसती ।।४।।एका जनार्दनी मारली बोंब । जन वन स्वयंभ एक जाले ।।५।।स्थुल, सुक्ष्म, कारण व महाकारण हे चार देह आहेत. या चारही देहांची होळी रचून, त्याला सदगुरू कृपेने प्रगट होणारा ज्ञानाग्नी लावून, ती होळी समुळ जाळून टाकली पाहिजे, आपण सदगुरूंनी दिलेल्या नामाची, त्यांनी शिकविलेल्या युक्तीने मनापासून बोंब मारावी व या संसार चक्रातून सोडवणूक होण्यासाठी, संताच्या मांदीयाळीला शरण जावे व यथार्थपणे सोडवणूक होईल.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुलाल किंवा अबीर शरीराच्या त्वचेला उत्तेजित करतं आणि आरोग्याला बळकट करतं, त्यात होळी हा सण अशा वेळेस येतो जेव्हा ऋतू बदलांमुळे लोकांमध्ये नैराश्य आणि उदासिनता जाणवते. उबदार हवामानामुळे शरीरात काही प्रमाणात थकवा आणि आळसपणा येतो. शरीराचा हाच थकवा आणि आळसपणा घालविण्यासाठी या हंगामात लोक फक्त गाणचं नव्हे तर बोलतानाही थोडे मोठ्यानेच बोलतात. त्यामुळे कळत-नकळत रोजच्या त्रासातून मनही हलके होते. या हंगामात ऐकू येणारे संगीत देखील जोरदारचं असतं. त्यामुळेच शरीरात नवीन उर्जा निर्माण होते. शुद्ध स्वरूपातील अबीर आणि गुलाल शरीरावर टाकल्याने याचा फार आरामदायी प्रभाव पडतो आणि यामुळे शरीर ताजेतवाणे होते. सगळ्यांसोबत गाणं गायल्याने, नाचल्याने एक वेगळाच उत्साह संचारतो. त्याने मन अगदी खुश होऊन जातं. होळी खेळण्यामागे या वैज्ञानिक बाबींचा विचार महत्वाचा आहे. महाराष्टÑात रंग पंचमीला अधिक महत्व आहे.-डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता. धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव