शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या सेवालयात मुस्लीम तरुणांची नमाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:32 IST

जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सेवालयात रविवारी ईद-ए- मिलादच्या निमित्ताने जणू ‘राम - रहिम’ गळाभेट घेत आहेत,

जळगाव : जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सेवालयात रविवारी ईद-ए- मिलादच्या निमित्ताने जणू ‘राम - रहिम’ गळाभेट घेत आहेत, अशा एकतेचे दर्शन घडले. रूग्णालयात सेवा देण्यासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी नमाजाची वेळ झाल्याने सेवालयात नमाज पठण केले.अयोध्या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा निघाल्याने संपूर्ण देशात सौहार्दचे दर्शन घडले आहे. यंदाच्या ईदला यामुळे देशभर एकात्मतेची अनोखी झळाळीही होती. त्या पार्श्वभूमीवर काही मुस्लीम बांधवांनी जिल्हा रूग्णालयात फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यातील काहींना रा़ स्व़ संघाच्या जनकल्याण समितीच्या सेवालयाबद्दल माहिती होती़ दोन मुस्लीम बांधवांनी या सेवालयात देणगीही दिली.नमाज पठनानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ विनायक वाणी, मंगला पाटील, पराग महाशब्दे यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते.>सेवालयामार्फत दैनंदिन अन्न वाटप केले जात असते. ईदनिमित्त या तरुणांनी आपल्या स्टॉलशेजारीच फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेळ झाल्याने त्यांनी नमाज पठणाबाबत विचारणा केली. आम्ही त्यास होकार दिला. आमच्यासाठी हा आनंद आणि गौरवदायी क्षण होता. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अशीच सद्भभावना वाढीस लागावी.- दीपक घाणेकर, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक