शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या ‘पॉज’ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:58 IST

जळगाव : पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या ‘पॉज’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘हलगी सम्राट’ ने व्दितीय व औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या ‘आगाज’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्देपुरुषोत्तम करंडक एकांकिका ‘नूतन’ची ‘हलगी सम्राट’ द्वितीय तर देवगिरी महाविद्यालयाची ‘आगाज’ तृतीय नाहाटाची ‘आली का’ ही चमकली

जळगाव : पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या ‘पॉज’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘हलगी सम्राट’ ने व्दितीय व औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या ‘आगाज’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. भुसावळ येथील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाची ‘आली का’ या एकांकिकेने प्रायोगिक एकांकिका पुुरस्कार पटकाविला.या चारही संघानी पुणे येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुरुषोत्तम करंडकाच्या महाअंतीम स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. पुणे येथील महाराष्ट्रीय कलोपासक मंडळ व मु.जे.च्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात पार पडली. रविवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पारितोषीक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.सुशील अत्रे हे होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री स्वानंदी टिकेकर उपस्थित होती. त्यांच्यासह जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, केसीई संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. चारुदत्त गोखले, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर, महाराष्ट्रीय कलोपासक पुणेचे समन्वयक राजेंद्र नांगरे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी व परीक्षक सुहास परांजपे, नूतन धवणे, डॉ.बाळकृष्ण दामले आदी उपस्थित होते.स्पर्धेचा निकालसर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य - सागर भडंगर (हलगी सम्राट, नूतन मराठा), सर्वोत्कृष्ट लेखक - धनश्री जोशी (आली का ?, नाहाटा महाविद्यालय), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अभिजित काळे (आगाज, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय (नैपुण्य)- नितीश कुळकर्णी (लाल चिखल, एसएसबीटीचे अभियांत्रिकी, बांभोरी), अभिनय (नैपुण्य स्त्री) - मोहिनी जोशी ( पॉज, प्रताप महाविद्यालय), अभिनय नैपुण्य पुरुष - दीपक बिºहारी ( पॉज, प्रताप महाविद्यालय), उत्तेजनार्थ - हनुमंत सुरवसे (हलगी सम्राट, नूतन मराठा), साक्षी वाणी (सेकंड हँड, महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, चोपडा), प्राजक्ता खिस्ते, उर्मिला सपकाळ (आगाज, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), मैथिली पुजारी (रूही, नेहरू अभियांत्रिकी, औरंगाबाद), श्रीकांत मंडलिक, श्रध्दा कांबळे (चने द्या चने, शासकीय अभियांत्रिकी, औरंगाबाद), श्रीकांत डाभे (लाल चिखल, एसएसबीटीचे अभियांत्रिकी, बांभोरी).

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर