शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

प्रसाद म्हणून गुंगीचे पदार्थ खायला देवून जळगावातून तरुणीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:55 IST

प्रसाद म्हणून गुंगीचा पदार्थ खायला देत चोवीस वर्षीय तरुणीला पळवून नेऊन नेणाºया वसीम उर्फ मद्दसर युसुफ खान (वय २१ रा. तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणीला पळवून लावण्यात मदत केल्याप्रकरणी अंजुम सय्यद (रा.तांबापुरा, जळगाव) हिच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला असून ती फरार आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथे केला बलात्कारतरुणाला पोलीस कोठडीमदत करणारी महिला फरार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १६ : प्रसाद म्हणून गुंगीचा पदार्थ खायला देत चोवीस वर्षीय तरुणीला पळवून नेऊन नेणाºया वसीम उर्फ मद्दसर युसुफ खान (वय २१ रा. तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणीला पळवून लावण्यात मदत केल्याप्रकरणी अंजुम सय्यद (रा.तांबापुरा, जळगाव) हिच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला असून ती फरार आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अंजुम सैयद हिने तांबापुरा भागातील पिरबाबा दर्ग्याजवळ पीडित तरुणीला प्रसाद म्हणून काही तरी खायला दिले. त्यात पीडित तरुणी शुध्द हरपली. त्याचा फायदा घेत वसीम खान याने पीडित तरुणीला पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार वसीम व अंजुम सय्यद या दोघांविरुध्द कलम ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी संशयिताचा शोध घेवून पीडित तरुणीला ताब्यात घेतले. वसीम याने दोन दिवसाच्या कालावधीत औरंगाबाद येथे मित्राच्या दुकानात बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिल्याने वसीम याच्याविरुध्द शनिवारी बलात्काराचे वाढीव कलम लावण्यात आले.दरम्यान, वसीम याला पोलिसांनी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्या.बी.डी.गोरे यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.निखिल कुळकर्णी यांनी काम पाहिले. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आता औरंगाबादला जाणार आहेत. मदत करणाºया अंजुम हिचाही शोध सुरु असून तिच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.