शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेला लटकलेल्या आजी व नातूचे वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:53 IST

चाळीसगाव रेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी पावणे आठला मुंबईकडे जाणारी अप सुपरफास्ट वाराणशी एक्सप्रेस चाळीसगाव येथे सिग्नल नसल्याने काही सेकंद थांबली होती. तेवढ्यात जिन्यावरून आजी व नातू धावत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र वयोवृद्ध आजीला गाडी सुरू झाल्याचा अंदाज आला नाही.

ठळक मुद्देचाळीसगाव रेल्वेस्थानकावरील घटनागाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने दुर्घटना टळलीबबन पवार यांची समयसूचकता, त्यांचे सर्वत्र कोतुक

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावरेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी पावणे आठला मुंबईकडे जाणारी अप सुपरफास्ट वाराणशी एक्सप्रेस चाळीसगाव येथे सिग्नल नसल्याने काही सेकंद थांबली होती. तेवढ्यात जिन्यावरून आजी व नातू धावत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र वयोवृद्ध आजीला गाडी सुरू झाल्याचा अंदाज आला नाही. तिने घाईत गाडीच्या दरवाजाजवळच्या पाईपला धरून नातवाला गाडीत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गाडीने बऱ्यापैकी वेग घेतला होता. गाडीत गर्दी असल्याने दरवाजाजवळच आजी व नातू लटकले होते. यावेळी पलाट क्रमांक तीनवर उभे असलेल्या प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला होता. आता आजी नातूला देवच वाचवेल, अशी अवस्था बघ्यांची झाली होती. अनेकांनी मोठ्याने आरोळ्या द्यायला सुरुवात केली व गाडी थांबविण्यासाठी गोंगाट केला. मात्र शहरातील पवार वाडीतील सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी यावेळी मोठ्या हिमतीने गर्दीतून सरळ आजी लटकलेल्या बोगीकडे धाव घेतली आणि आजीला व नातवाला धरून गाडीतून ओढले.यावेळी आजीच्या पाठीला तर बबन पवार यांच्या हाताला जखम झाली. याप्रसंगी घडलेल्या थरारचा अनेकांनी अनुभव घेतला. उपस्थित शेकडो प्रवाशांनी बबन पवार यांच्या धाडसाचे कौतुक केले.गाडीला लटकलेल्या अवस्थेत असलेली ६५ वर्षीयआजी व २० वर्षीय नातू हे काही सेकंदात गाडी खाली आले असते आणि जीव गमावून बसले असते. परंतु देवदूतासारखे धावून आलेले बबन पवार यांच्या हिमतीने दोघांचे प्राण वाचले. यावेळी प्रकाश जाधव व मनोज पाटील यांनी त्यांना धीर दिला. या घटनेची रेल्वे प्रवाशांमध्ये चर्चा दिसून आली. 

टॅग्स :railwayरेल्वेChalisgaonचाळीसगाव