शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमृतरावांचा शैक्षणिक वारसा चालविताहेत प्रमोद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:35 IST

जामनेर तालुक्यातील सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) अमृतराव चिंधूजी पाटील यांनी नेरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. त्यांचा वारसा प्रमोद पाटील हे समर्थपणे पुढे नेत आहे.

मोहन सारस्वत/ लियाकत सैय्यदजळगाव : जामनेर तालुक्यातील सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) अमृतराव चिंधूजी पाटील यांनी नेरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. त्यांचा वारसा प्रमोद पाटील हे समर्थपणे पुढे नेत आहे.अमृतराव पाटील यांनी सलग २५ वर्षे शिक्षण संस्थेची धुरा सांभाळली. त्यांच्यानंतर प्रमोद पाटील हे गेल्या १५ वर्षापासून संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांनी संस्थेत डी.एड. महाविद्यालय, मोनालीसा इंग्लिश मीडियम स्कूल, विज्ञान शाखा व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरु केले.संस्थेची रोटवद व नेरी येथे माध्यमिक शाळा आहे. नेरीला कनिष्ठ महाविद्यालय आहे. नेरी येथे स्वमालकीची सुसज्ज इमारत असून यात संगणक प्रयोगशाळा आहे. दोन्ही शाळांत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.निकालाची उच्च परंपरा कायम आहे. प्रमोद पाटील हे वडिलांचा सहकार व राजकीय क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालवित आहेत. नेरी विकास संस्था, जामनेरातील पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत.जळगाव येथील सहकार बोर्ड व पतसंस्था फेडरेशनचे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. प्रमोद पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेने राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. प्रमोद यांच्या पत्नी वर्षा पाटील यांनी नेरी जि.प.गटाचे २००४ ते २००९ पर्यंत प्रतिनिधीत्व केले.कृषी पदवीधारक असलेल्या पाटील यांनी जळगावला पाटील बायोटेक या कृषी क्षेत्राशी संबंधीत कंपनी सुरु केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.स्व.अमृतराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गेल्या महिन्यात माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते नेरीला झाले. त्यावेळी शरद पवार यांनी प्रमोद पाटील यांना अमृतरावांचा राजकीय व शैक्षणिक वारसा पुढे चालविण्याचा सल्ला दिला होता. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून ते वाटचाल करीत आहेत.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव