ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.1- आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आजपासून संपावर गेले आहेत. मात्र या संपाचा अमळनेरात पहिल्यादिवशी कुठलाही परिणाम जाणवला नाही. भाजीबाजारात स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांसह परराज्यातील भाजीविक्रेतेही आले होते.
शेतक:यांच्या संपामुळे भाजीपाला आणि दूध विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संपाच्या पहिल्या दिवशी अमळनेरात सकाळी ठिकठिकाणी दूध विक्री सुरू होती. तर भाजीपाला बाजारात स्थानिक शेतक:यांसोबत पर राज्यातील भाज्या देखील विक्रीस आल्या होत्या. मात्र रोज येणा:या आवकपेक्षा आजची आवक कमी असल्याचे अडत व्यापारी भाईदास महाजन यांनी सांगितले. स्थानिक शेतक:यांनी भाज्या तोडून ठेवल्या असतात. तर पर राज्यातील व्यापा:यांना संपविषयी माहिती नसल्याने त्यांनी माल विक्री साठी आणल्याचे महाजन यांनी सांगितले
स्थानिक शेतक:यांनी किरकोळ स्वरूपात गिलके, भेंडी, गोल भेंडी, आणि गवार आदी भाज्या विक्रीस आणल्या होत्या. टमाटे संगमनेरहुन, कोबी, फ्लॉवर या भाज्या नाशिकहुन तर आंध्रप्रदेश, गुजरात येथून कैरी, पंजाब मधून मिरची, मध्यप्रदेशातून कोथिंबीरची आज आवक झाली होती.