शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानात सराव, सायकलवर साहित्याची केली ने-आण, अन् पटकावला नेमबाजीत मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST

आस मैदानाची : आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा रायफल असोसिएशनकडून रेंजची व्यवस्था नव्हती. त्यावेळी १९८७ मध्ये ...

आस मैदानाची : आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा रायफल असोसिएशनकडून रेंजची व्यवस्था नव्हती. त्यावेळी १९८७ मध्ये शिवाजी उद्यानात आणि नंतर नवीपेठेतील नगरपालिकेच्या शाळेत नेमबाजीचा सराव सुरू होता. याच काळात पाच एअर रायफल, पाच फोल्डिंग लोखंडी स्टॅंण्ड आणि टार्गेट असे साहित्य तांबापुरासमोरून प्रशिक्षकांसोबत सायकलवर ने-आण केली. अन् अखेरीस जिल्ह्यातील पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचा मान गणेश दिलीप गवळी याने पटकावला. त्याने चेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या ज्युनियर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

जेव्हा कोणतीच सुविधा नव्हती तेव्हा पाच एअर रायफल, स्टॅण्ड असे साहित्य असोसिएशनचे अध्यक्ष विशन मिलवाणी यांच्या तांबापुरा समोरील कार्यालयातून प्रशिक्षक दिलीप गवळी, सुनील पालवे, प्रा. यशवंत सैंदाणे, विलास जुनागडे व दिलीप गवळी यांचे प्रकाश, ललित व गणेश हे तीनही लहान मुले सायकलींवर हे सर्व साहित्य ने-आण करीत होते. प्रकाश आणि ललित यांच्याप्रमाणेच गणेश यालाही नेमबाजीची आवड निर्माण झाली. कुटुंबातच नेमबाजी असली तरी गणेश याने नेहमीच एक पाऊल पुढे टाकले. ऑगस्ट १९९४ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेत ओपन साईट एअर रायफलमध्ये तो सहभागी झाला. त्यानंतर मुंबईत १९९६ मध्ये राज्य नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले, तर १९९७ ला औरंगाबादला पहिले सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये खेळून यश मिळवले. मात्र २००१ ला चेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या ज्युनियर ऑलिम्पिक स्पर्धेत गणेश गवळी याने भारताचे प्रतिनिधित्व केले. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण ठरला. गणेशने २००२ ते २००८ या काळात इंडो-तिबेटियन पोलीस नेमबाजी संघाकडून खेळ केला. त्याने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकेदेखील पटकावली. २००८ मध्ये गणेश महाराष्ट्र वनविभागात रुजू झाला. त्यानंतरदेखील ऑल इंडिया फॉरेस्ट मीटमध्ये तो महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतो. त्याने २०११ मध्ये देहरादूनला झालेल्या आणि २०१३ मध्ये हरियाणातील पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे, तर २०१७ मध्ये हैदराबादला झालेल्या स्पर्धेत ५० मीटर प्रोन स्पर्धेत आणि थ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

कोट - मी ज्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळू शकलो त्यात जळगाव रायफल असोसिएशनचे संस्थापक विशन मिलवाणी आणि प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. साहित्याचा अभाव असतानाही त्यांनी ज्या पद्धतीने शिकवले त्याचा प्रत्येक स्पर्धेत मोठा फायदा झाला.

- गणेश गवळी, नेमबाज