शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या पंखांना ‘उडाण’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:03 IST

स्वावलंबनासाठी स्वयंरोजगार : दिव्यांग मुलांनी तयार केल्या पणत्या

ठळक मुद्देस्वत:च्या मुलापासून प्रेरणाफळ, भाजीपाला लागवड करणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10-  दिव्यांग मुलांनादेखील स्वाभिमान व स्वावलंबनाने जगता यावे यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत जळगावातील ‘उडाण दिव्यांग व्यवसाय प्रशिक्षण केंद्रा’ने या मुलांच्या पंखांना बळ दिले आहे. केंद्राच्या प्रशिक्षणानंतर या मुलांनी तयार केलेल्या पणत्या, सुकामेवा, चॉकलेटचे पॅकिंग बॉक्स यांना चांगलीच मागणी वाढली असून या मुलांच्या परिश्रमाला फळही येत आहे.  दिव्यांग, गतीमंद, मतीमंद मुलांच्या शिक्षणाची दहावीनंतर सोय नसल्याने त्यांना रोजगाराच्या संधी नगण्यच. त्यामुळे अशा मुलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी जळगावातील आराधना कॉलनीतील रहिवासी तथा लेवा पाटील समाजाच्या ‘लेवा सम्राज्ञी ग्रुप’च्या सचिव हर्षाली प्रवीण चौधरी यांनी पुढाकार घेतला.  

हर्षाली चौधरी यांच्या मुलाला अचानक अपंगत्व आले. घरात त्याचा संभाळ करण्यासाठी स्वत:सह पती व कुटुंबातील इतर सदस्य आहे, मात्र ज्या दिव्यांग मुलांची परिस्थिती नाजूक असते, त्यांचे काय? असा प्रश्न त्यांना पडला व त्यांनी दिव्यांग मुलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्यांनी ‘उडाण दिव्यांग व्यवसाय प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना केली व या मुलांच्या जीवनात आशेचा नवीन किरण निर्माण केला. 

महिनाभरात विद्याथ्र्याच्या कामाला दामहर्षाली चौधरी यांनी एक महिन्यापूर्वीच प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गाला सुरुवात केली. यामध्ये मुलांना प्रशिक्षण मिळताच या मुलांनी आपल्यातील गुणांचे दर्शन घडविले. यामध्ये या मुलांनी दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर विविध रंगाच्या व विविध आकारातील पणत्या आकारास आणल्या आहेत. सोबतच सुकामेवा, चॉकलेट यांचे पॅकिंग बॉक्स तयार करून या वस्तू त्यात भरून बाजारपेठेत नेण्यासाठी सज्ज केल्या. यामध्ये या वस्तूंना चांगलाच प्रतिसाद मिळून मोठय़ा प्रमाणात विक्री होऊन मुलांच्या हस्तकलेला दामही मिळत आहे. यासाठी या वस्तू काव्यरत्नावली चौक, सागर पार्क नजीकच्या अग्रवाल समाज सभागृह तसेच वर्सी महोत्सवात विक्रीसाठी ठेवल्या असता त्यांना चांगलीच मागणी राहिली.

एकदा सांगताच वस्तू तयारया वस्तूंचे प्रशिक्षण देताना एकदा या मुलांना कोणती वस्तू कशी करायची हे सांगितले तर त्याबाबत त्यांना पुन्हा सांगावे लागत नाही, हे विशेष. 

नफा मुलांच्या भविष्यासाठीया वस्तूंमधून जो काही नफा मिळणार आहे, तो पूर्णपणे याच मुलांसाठी वापरून त्यांच्या भविष्यासाठी तो उपयोगात आणला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या 20 मुलांच्या हाताला काम मिळाले आहे. 

विविध वस्तू तयार करण्यासह आता यापुढे फळ, भाजीपाला लागवड उपक्रम राबवून मुलांना अधिक उत्पन्न मिळवून देण्याचा मनोदय हर्षाली चौधरी यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी त्यांचे पती प्रवीण चौधरी, घरातील सर्व 12 सदस्य तसेच माहेरच्या मंडळींचीदेखील मोठी साथ मिळत आहे. या मुलांना हर्षाली यांच्यासह रईस काझी, सोनाली पाटील हे प्रशिक्षण देत आहे. सोबतच लीना चौधरी, सुप्रिया चौधरी, शुभांगी चौधरी, अनघा कुलकर्णी, राजश्री कुलकर्णी, लता अग्रवाल, हेमा शिरसाळे, बापू पाटील, सुभाष पाटील, स्वाती गोरे, वसुधा महाजन, धनंजय महाजन, अलका कोल्हे हे सहकार्य करतात.