शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जळगावात रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला उद्योजकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:29 IST

दुचाकीवरुन तोल जाऊन पडल्याने मिनीट्रक गेली डोक्यावरुन

जळगाव : रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी एका उद्योजकाचा बळी घेतला. घराकडे परतणारे द्वारका इंडस्ट्रीजचे संचालक अनिल श्रीधर बोरोले (६८, रा़ पोस्टल कॉलनी) यांची दुचाकी चित्रा चौकाजवळील खड्ड्यामुळे उधळली आणि ते दुचाकीसह रस्त्यावर पडले़ त्याचवेळी मागून येणाऱ्या मिनी ट्रकने त्यांना चिरडले आणि त्यांचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.दरम्यान, अपघातानंतर मिनी ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर दुसरीकडे खड्ड्यांमुळो बळी गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला़ अनिल बारोले हे शहरातील पोस्टल कॉलनी येथे पत्नी शितल व मुलगा निरंजन यांच्यासह वास्तव्यास होते़ एमआयडीसी परिसरात त्यांची द्वारका इंडस्ट्रीज ही कंपनी असून याठिकाणी इलेक्ट्रीक कंट्रोल पॅनल बनविले जातात़ शनिवारी सुटी असल्याने सायंकाळी ते शहरात त्यांच्या खाजगी कामानिमित्त आले होते़ दुचाकीने (एमएच़१९़डीबी़ ४०४८) घराकडे निघाले़ चित्रा चौकाजवळील चार फुट लांबीचा खड्ड्यातून त्यांची दुचाकी गेली अन् तोल जावून दुचाकीसह ते रस्त्यावर कोसळले़ मागून येणाºया मिनी ट्रक (एमएच़०४़डीडी़६४५३) चे मागील चाक हा त्यांच्या डोक्यावरून गेले.बघ्यांची गर्दी तर दुसरीकडे वाहतूक विस्कळीतअपघात होताच चित्रा चौकात बघ्यांची प्रचंड गर्दी झालेली होती़ दुसरीकडे अपघात झालेला रस्ता हा बंद झाल्यामुळे दुसºया एकाच मार्गाने वाहतूक सुरू झाली़ त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता़ ही वाहतूक सुरळीत करण्यास शहर वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले़ काही वेळानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावर झालेली गर्दी पांगविली़कधी येईल मनपा प्रशासनाला जाग ?शहरातील खड्डयांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ सर्वाधिक अपघात महामार्गावर झालेली आहेत़ मात्र, आता चक्क शहरातच खड्डयामुळे उद्योजकाला आपला जीव गमवावा लागला़ मनपा प्रशासनाने आता तरी शहरातील रस्त्यांचा विचार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे़आमदारही पोहोचले घटनास्थळीअपघाताची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे व आमदार चंदूलाल पटेल यांनी घटनास्थळी नंतर जिल्हा रुग्णालयात पोहोचले.नागरिकांचा प्रचंड संतापसध्या शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून जागो-जागी खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे रस्त्यांवर प्रचंड चिखल होत आहे. त्यामुळे चालणेही कठीण झाले आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी खड्ड्यांमुळे अनिल बोरोले यांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी लोकप्रतिनिधींबद्दल तीव शब्दात नाराजी व्यक्त करित संताप व्यक्त केला़ नगरसेवकांना अपात्र ठरवा व रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करण्याची मागणी केली़कागदपत्रांवरुन पटली ओळखअपघात होताच मिनी ट्रकचालकाने पळ काढला़ अपघात झाल्यानंतर घटनास्थळी प्रचंड नागरिकांनी गर्दी केली़ शहर वाहतूक व जिल्हापेठ आणि शहर पोलीसही घटनास्थळी पोहचले. चेहºयाचा चेंदामेंदा झाल्यामुळे मयत व्यक्ती कोण होती़ हे कुणालाही ओळखता येत नव्हते़ अखेर दुचाकीत मिळालेले काही कागदपत्रांमुळे त्यांची ओळख पटली.अनिल बोरोले हे जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष होते. रामानंद नगर परिसरात समाजातील मुलांसाठी सुरु केलेले वसतिगृह गेल्या १५ वर्षापासून सुरु आहे. रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष होते. अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव